तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

श्री.संत संताजी जगनाडे महाराजांची जयंती शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी

 वैजनाथ दि.०८ (प्रतिनिधी) :- 
             श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती येथील शनिमंदिरात शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने रविवारी (ता.०८) उत्साहात साजरी करण्यात आली.    
            येथील शनिमंदिरात तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नंतर मान्यवरांनी श्री.जगनाडे महाराज यांचा जिवनपट मांडला. हे संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील एक प्रमुख टाळकरी होते. तुकाराम महाराजांनी ज्या रचना रचल्या त्या सर्व जगनाडे महाराजांना मुखोद्गत होत्या. तुकाराम महाराजांच्या रचना व गाथा लिहीण्याचे कार्य संताजी जगनाडे महाराजांनी केले. तेली समाज संताजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. त्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात परिचय झाला. वारकरी संप्रदाय गेल्या अनेक वर्षांपासून जयंती, पुण्यतिथी साजरी करतात. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाने शासकीय परिपत्रकामध्ये जयंतीचा समावेश केला. या कार्यक्रमास संघटनेचे सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment