तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 11 December 2019

महाविकास आघाडीचा राज्यातील पहीला विजय परळीत


धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली सिरसाळा ग्रामपंचायत सरपंच निवडणूक जिंकली ; आश्रुबाई किरवले यांनी भाजपा उमेदवाराचा 1395 मतांनी केला  पराभव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.09......... राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी
काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपला पहिला विजय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नोंदवला आहे. परळीचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती आश्रुबाई विश्वनाथ किरवले यांनी जिंकली असून त्यांनी भाजपा उमेदवारांचा तब्बल 1395 मतांनी पराभव केला.

परळी तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी काल रविवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमती आश्रुबाई किरवले या उभ्या होत्या.

 राज्यात नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्याचा पहिलाच प्रयोग धनंजय मुंडेंनी सिरसाळा या आपल्या मतदारसंघात करताना तिन्ही
पक्षांना एकत्रित करून एकच उमेदवार उभा केला. या उमेदवाराने भाजपा उमेदवार आशाबाई कपिल चोपडे यांचा 1395 मतांनी पराभव केला.

आज मतमोजणी नंतर गावातून भव्य मिरवणूक काढून महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. धनंजय मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रुबाई किरवले
यांचे अभिनंदन केले आहे. या विजयासाठी तिन्हीही पक्षाच्या
कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a comment