तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

डोणगाव येथे असे विद्युत मिटर आहेत ज्यांची जोडणी झालेली आहे मात्र विद्युत वितरण विभागाकडे त्याची कोणतीच नोंद नाही.:-- डोणगांव येथे चारसे ते साडेचारशे विद्युत मिटर गायब असल्याची चर्चा

डोणगांव :--३

डोणगांव जिल्हातील सर्वात मोठे गांव  असून त्या ठिकाणी विद्युत वितरणाचे उपकेंद्र सुद्धा आहे मात्र मागील काही महिन्या पासून येथे अभियंत्यांचे दर्शन नाही त्यामुळे गावातील कित्येक विद्युत समस्या रेंगाळत पडलेल्या आहेत. तर येथील कर्तव्य दक्ष  विद्युत कर्मचाऱ्यांनी  कोणतीही कागदपत्रांची पूर्तता न करताच ग्राहकांन सोबत आर्थिक व्यवहार करून  मीटर जोडले आणि त्यांची कोणतीही नोंद नसल्याने त्यांनी जळलेली विद्युतचे भुर्दंड गावातील सामान्य जनतेला भरावे लागत आहे.
   डोणगाव व परिसरात बारा ते चौदा गावात नऊ ते दहा हजार विद्युत मिटर जोडल्याचे समजते  परंतु डोणगांव विद्युत सब स्टेशन ला काही महीन्या पासुन विद्युत अभियंता नाही आणि  येथील कार्यदक्ष विद्युत कर्मचाऱ्यांनी कोणीही या पैसे द्या व विद्युत कनेक्शन घ्या असे धोरण अवलंबुन ४००ते ४५० विद्युत मिटर गायब केल्याची चर्चा विद्युत विभागातून बाहेर येत आहे.
 अश्यात मागील काही वर्षांपासून लोक बिनदिक्कत विद्युत जाळत आहेत तर काही बहाद्दरणी आपल्या येथून दुसर्यांना सुद्धा भाड्याने लाईन दिलेली आहे. ज्यामुळे त्यांनी जळलेली विद्युतचा फटका  नियमित बिल भरणार्यांना बसत असल्याचे दिसून येतो विद्युत वितरण कंपनी जी तूट येईल त्याचे भुर्दंड इतर सर्व ग्राहकांवर लागते. अश्यात फुकटात विद्युत जाळणारे मोकळे आणि नियमित बिल भरणाऱ्या ना त्याचा फटका सहन करत असल्याचे दिसून येत आहे .
परंतु डोणगांव परीसरात विद्युत कर्मचार्‍यांच्या आर्शीवादाने काही खाजगी विद्युत काम करनारे सुध्दा स्वताला विद्युत कर्मचारी समजुन विद्युत मिटर जोडने बिल वसुली करने व इतर कर्तव्य पार पाडत असल्याचे दिसते. 
    मागील काही वर्षात फक्त पैसे द्या कोणतेही कागदपत्र न देता अवघ्या काही तासात मीटर लावून घ्या असे प्रकार येथे झाले आहे. ऑफिस मध्ये  बिघाड असलेले  मीटर लावून वीज जोडणी करून दिली व त्याची कोणतीही नोंद नसल्या कारणाने या अनधिकृत विद्युत जोडणीचा कोणतेही बिल येत नाही तेव्हा या अवैध विद्युत जोडणीचा वाली कोण हा प्रश्न निर्माण होतो.
यावर विद्युत वितरण विभागाने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही केलीतर बोगस मीटर किती हे दिसून येतील.
     (या संबंधी विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की बोगस मीटर असतील परंतु हे विद्युत मिटर पुर्वी कर्तव्यावर असणार्‍या कर्मचार्‍यांची कृपा  आहे या बद्दल आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याना कळवले आहे. )


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment