तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

:-- पोलिस स्टेशन परिसरात विषारी औषध प्राशन करणाऱ्या इसमाचा अखेर मृत्यू .:-- अंतर्गत वादातून केले होते विषप्राशन.

:-- पोलिस प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

बुलडाणा :-

जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान आसलगाव येथील ताई उखर्डा भोंबे या महिलेने आपल्या जवळचाच  नातेवाईक असणाऱ्या पुरुषोत्तम नारायण भोंबे यांच्याविरोधात जळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सदर महिलेच्या तक्रारीवरून जळगाव पोलिसांनी आरोपी पुरुषोत्तम  यांच्याविरुद्ध कलम 294 , 506 34 भादवि नुसार गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीमुळे आरोपी पुरुषोत्तम यांचे वडील विचलित होऊन त्यांच्या वतीने सुद्धा त्यांच्या मुलाने जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळे पुरुषोत्तम यांचे वडील नारायण भोंबे विचलित होऊन पोलीस स्टेशन आवारातच त्यांनी विषारी औषध  प्राशन केले होते . त्यांना तात्काळ उपचारासाठी   जळगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना काल रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. मयत व्यक्तीच्या नातेवाईक च्या वतीने विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.
मयत व्यक्तीच्या मुलाने स्थानिक पोलिसांवर आरोप केले असून माझ्या वडिलांच्या मृत्यूस स्टेशन डायरी पोलीस कर्मचारी बोंबटकार हेच आहे अशी तक्रार त्यांनी जळगाव पोलीस स्टेशनला काल केली.जो पर्यंत दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठेवल्या जाईल असा संताप मृतकाच्या नातेवाईकांचा दिसून आला.

 परंतु स्थानिक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावून आम्ही त्यादिवशीच मयत व्यक्तीच्या मुलाची सुद्धा तक्रार दाखल केली असून चार आरोपी विरोधात गुन्हे दाखल केले. 
परिस्थिती गंभीरता पाहून sdpo बोबडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना दोशी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला.

जमील पठाण 
8805381333

No comments:

Post a comment