तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

संभाजी ब्रिगेड वर्धापनदिना निमित्ताने मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार प्रदान
धुळे प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेड धुळे महानगर तर्फे संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिना निमित्ताने धुळे येथे श्री छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार सोहळा पार पडला. संभाजी ब्रिगेड सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात आपले संपूर्ण योगदान देत आहे. शंभरटक्के राजकारण व शंभरटक्के समाजकारण ह्या तत्वांवर चालणारी संघटनात्मक पक्ष म्हणून कार्य करीत आहे. संभाजी ब्रिगेड नेहमीच आपल्या विविध आंदोलने व नागरिकांच्या समस्या ह्यावर आवाज उठवीत असतो. कुठल्याही दबाव तंत्राला बळी न पडता संभाजी ब्रिगेड आपले कार्य करीत आहे. संभाजी ब्रिगेड तर्फे ह्यावर्षी प्रथमच पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. समाजातील सामाजिक , शैक्षणिक, कृषि तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
   कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ ह्याना वंदन करून करण्यात आली सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अडव्होकेट श्री एम.एस.पाटील हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.राजवर्धजी कदमबांडे हे होते सदर कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून दैनिक पुण्य नगरी चे संपादक मा. विलासजी पवार , श्री बी.टी देवरे, मराठा सेवा संघाचे केंद्रीय पदाधिकारी मा.संजय पाटील, लहू पाटील, संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष हेमंत भडक, उषा साळुंखे, राज तायडे, मनोहर पाटील, अनिल पवार, आनंद पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. 
        ह्यावेळी दैनिक पुण्य नगरी चे संपादक मा. विलासजी पवार सर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज आपल्या समाजात असे अनेक व्यक्तिमत्त्व आहेत की ज्यांना आपण खूप जवळून ओळखतो परंतु त्यांच्या कार्याची माहिती आपल्याला ठाऊक नसते कुठेतरी असे व्यक्ती हे प्रसिद्धीपासून लांबच असतात ते आपले कार्य करतात तेही कुठलाही गाजावाजा न करता आणि काम झाले की ते निघून जात असतात. अश्या व्यक्तिमत्वचा गौरव ह्याठिकानी करण्यात आला ही खूप मोठी गोष्ट आहे. अश्या व्यक्तिमत्वाना आपण प्रकाश झोतात आणलेच पाहिजे आणि दरवर्षी असाच कार्यक्रम ब्रिगेड ने घ्यावा असे देखील त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे पाहुणे मा.बि.टी.देवरे ह्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर मराठा क्रांती मोर्चा सचिव मा.निंबा मराठे ह्यांनी देखील आपके मनोगत व्यक्त करताना आपल्या भावना व समाजाने एकत्रित राहावे ह्यासाठी प्रयत्न करायला हवे तसेच तरुणांना आपण समाजकार्यात पुढे आणायला हवे असे परखड मत त्यांनी ह्यावेळी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा एम.एस.पाटील ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुरस्कर प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्यात व आपले कार्य असेच जोरदार सुरू असु द्यावे ह्यासाठी प्रेरणा दिली. तसेच उद्योजक अविनाश पाटील ह्यांनी तरुणांनी तसेच समजतील व्यक्तींनी उद्योजकतेकडे वळावे व त्याबाबतीत त्यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांना मार्गदर्शन केले. 
सम्पूर्ण जिल्हाभरतून ह्यावेळी 16 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात निंबा मराठे , अविनाश पाटील  , मीना भोसले ( चाइल्ड लाइन प्रोजेक्ट ) , दिनेश आटोळे, विकास चंद्रकांत मराठे, साहेबराव देसाई, डॉ.सुलभा कुवर, डॉ.योगेश ठाकरे, अमोल मराठे, टी.पी.शिंदे, संजय पाटील, राजमुद्रा ग्रुप , शरद पाटील , ज्ञानेश्वर पाटील, योगेश पवार, हिम्मतराव पाटील आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
     कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भारतीय खो खो संघाचे माजी उपकर्णधार मा. आनंद पवार सर, श्याम निरगुडे, उदय पवार, ऋषी दाभाडे, अमर फरताडे, विकास मराठे ह्यांनि प्रयत्न केले
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष श्याम निरगुडे ह्यांनी केले. तर सूत्रसंचालन विधानसभा अध्यक्ष विकास मराठे ह्यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार शहर सचिव मा.अमर फरताडे ह्यानि मानले.

No comments:

Post a comment