परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
हेळंब येथे खंडोबा यात्रेनिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपर्यातुन भक्त दर्शनासाठी आले होते. गावातुन खंडोबाची पालखी वाजत गाजत काढण्यात आली. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने हेळंब परिसर दणाणुन गेले होते. पालखीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी दर्शन घेतले. शोभेची दारु उडवणून पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीवर भंडारा उधळण्यात आला. ग्रामस्थ पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. दरम्यान ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने मल्लासाठी (पैहलवान) बुधवार दि.04 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. कुस्ती स्पर्धेत मल्लांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
दरवर्षी खंडोबाच्या यात्रेनिमित्त हेळंब येथे भरणाऱ्या कुस्ती स्पर्धेकडे महाराष्ट्रातील मल्लांचे कुस्तीपटूचे लक्ष लागलेले असते.याही वर्षी बुधवार, दि.04.डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे. मैदानात होणाऱ्या स्पर्धेत नामवंत मल्लांचा खेळ पाहावयाचि संधी कुस्तीप्रेमींसाठी मिळणार आहे.
संगणकीय युगामध्ये लोप पावत चाललेल्या कुस्ती या अस्सल मैदानी खेळाची गोडी नव तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी, म्हणून प्राचीन ग्रामीण भागात यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात.
परळी तालुक्यातील खंडोबाची सर्वात मोठी यात्रा म्हणून हेळंब येथील यात्रेकडे पाहिले जाते. तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी व परिसरातील ग्रामीण भागातुन भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. तरी पंचक्रोशीतील मल्लांनी कुस्ती स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment