तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

नंदनज येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदनज येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मित्ती मार्गीशीर्ष शु.11 रविवार, दि.08 डिसेंबर पासून सुरुवात व  मित्ती मार्गीशीर्ष ,वद्य 3  रविवार, दि. 15 डिसेंबर रोजी सांगता होणार आहे. 

             तालुक्यातील नांदनज येथे अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून कलशपुजनाने प्रारंभ झाला. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावात आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 
           नंदनज येथे श्री हनुमान व श्री संत केदारी महाराज यांच्या कृपेने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख म्हणून ह.भ.प.तुकाराम महाराज गुट्टे लोकरवाडीकर हे आहेत. दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ६ काकडा आरती, पहाटे ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्‍वरी पारायण, दुपारी ११ ते १  श्री तुकाराम गाथा भजन, दु. २ ते ५ भावार्थ रामायण, ६ ते ७ धुपाआरती व रात्री ९ ते ११ हरि किर्तन व १२ ते २ जागर कार्यक्रम होणार आहेत.  या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तने होणार असून यामध्ये   दि.08   ह.भ.प.भागवताचार्य देविदास महाराज भांगे, लातूर, दि.09  ह.भ.प.भागवताचार्य उध्दव महाराज ठोंबरे, दिंद्रुड, दि.10  ह.भ.प.केशव महाराज घुले शास्त्री, टाकळी, दि.11 ह.भ.प.ज्ञानोबा महाराज लटपटे, कोद्रीकर, दि.12  ह.भ.प.भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे शास्त्री टोकवाडीकर, दि.13 ह.भ.प. वैराग्यमुर्ती प्रभाकर महाराज झोलकर, दि.14 ह.भ.प.किर्तन केसरी महादेव महाराज राऊत यांचे रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. दि.15  दुपारी १२ ते २  ह.भ.प. बाळासाहेब महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. ह.भ.प गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज उखळीकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. श्रींची पालखी शुक्रवार, दि.13 रोजी श्रीक्षेत्र उखळी बु.येथून निघणार व कासारवाडी व केदारेश्वर मार्गे नंदनज येथे दुपारी चार वाजता पोहोचणार आहे.
        या सप्ताहात विविध गुणीजण मंडळी,सात दिवस भजनी मंडळी, तसेच पंचक्रोशीतील श्रोतेगण,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत केदारेश्वर संस्थान व समस्त गावकरी,भक्त मंडळी नंदनज यांनी केले आहे.

No comments:

Post a comment