तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

जिल्हा अधिकारी यांनी समस्या जाणून घेण्या साठी उप विभागीय अधिकारी यांना पाठवून देखील समस्या जैसे थे.:--  ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या अंर्तंगत कलहामुळे गावाच्या विकासाला खीळ. 

डोणगांव :- ४
बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या डोणगाव या  गावातील नागरिकांना ग्रामपंचायत च्या सरपंच व सदस्य यांच्या अंर्तंगत कलहामुळे    मुलभूत व भौतिक सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे गावात पिण्याचे पाणी,साफ सफाई,अतिक्रमण,जागो जागी कचऱ्याचे ढीग,मच्छर अश्या अनेक समस्यांनी ग्रासले तेव्हा  जिल्हा अधिकारी यांनी वृत्तपत्र मधील बातम्यांची दखल घेऊन डोणगाव मधील जनतेच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजना करण्या साठी उप विभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पाठविले मात्र अद्याप ज्या समस्या आहेत त्या जशाच्या तश्याच आहेत विकास कामाला सुरुवात झालीच नाही.

     जिल्हा अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी १६ नव्हेंबर रोजी उप विभागीय अधिकारी गणेश राठोड,तहसीलदार संजय गरकल यांना पाठविले व त्यांनी ग्राम पंचायत डोणगाव मध्ये एक बैठक घेतली त्यात ग्राम पंचायत सदस्य ,सरपंच ,ग्राम सेवक,आरोग्य अधिकारी,तलाठी यांच्या समवेत गावातील समस्या जाणून घेतल्या मात्र २० दिवस होऊन देखील कोणत्याही विकास कामास सुरवात झाली नाही गावातील सर्वच्या सर्व समस्या जशाच्या तश्याच खितपत पडलेल्या आहेत एक तर गावातील नळ योजना असून नळ येत नाही तर दुसरी महाजल नळ योजना पाच कोटींची आहे परंतु 
 लालफित शाहित अडकली,
आठवडी बाजारात अतिक्रमण सोबतच कचऱ्याचे ढीग लागले आहेत ,गावातील नाल्यात सफाई नसल्याने मच्छरांचे वाढते प्रमाण आणि मच्छर जन्य रोगाचे थैमान अश्यात गावात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे येथील लहरी चौक परिसरातून संपूर्ण गावातील नाल्यांचे पाणी वाहून नेणारी मोठी नाली आहे मात्र गेल्या कित्येक महिन्या पासून याची सफाई न झाल्याने जागोजागी पाणी तुंबले त्याने मच्छर झाले आणि त्याचा परिणाम रोगराई पसरण्यावर होत आहे येथील असे कित्येक लोकांना मच्छरजन्य रोगाला सामोरे जावे लागत आहे मात्र जिल्हा अधिकारी यांनी आदेश देऊन देखील कोणतीच सुधारणा होत नसेल तर मेहकर तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी वर्गाला कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे हा प्रश्न निर्माण होतो.गेल्या कित्येक महिन्या पासून गावात कोणतीच सुधारणा नाही तर विकास कामे ठप्प आहेत.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment