तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

हैद्राबादेतील नराधमानां फाशी देण्याची अनिस व सामाजिक संघटनेची मागणी;मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन.परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  हैद्राबाद येथे एका महिला डाँक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करून तिला जिवे मारून जाळल्याची घटना घडली त्याचा निषेध व
त्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना परळी तहसिलदारा मार्फत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा परळी व शहरातील विविध सामाजिक संघटनेतर्फे मंगळवार  दि.3 डिसेंबर रोजी  जोरदार निदर्शने करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.
      
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा
परळी व विविध सामाजिक संघटनेतर्फे परळी तहसिल येथे हैद्राबाद येथील महिला डाॕक्टर प्रियांका रेड्डीवर झालेल्या अमानुष अत्याचार,ठार मारणे व जिवंत जाळने सारख्या घटने बद्दल निदर्शने करण्यात आली आहे. तसेच  या घटनेने देश व खास करून माता,भगिनीमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.अशा अमानुष घटनानां चाप बसावा म्हणुन केंद्र
शासनाने कायद्यात बदल केला आहे मात्र
त्याची अमलबजावणी कठोरपणे होत नसल्याने अशा घटनेत दर रोज वाढ होत
आहे व त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अशा घटनेला पायबंद घालण्यासाठी जो कायदा केला गेला त्याची कठोर अमलबजावणी करणे साठी सर्व लोकप्रतिनिधीनां विश्वासात घेवुन या बाबतच्या कायद्यात अजुन काय सुधारणा
करता येईल ती करावी व अशा नराधमानां फक्त फाशीचीच शिक्षा मिळावी असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर पी एस घाडगे, प्रा बी.जी खाडे, प्रकाश चव्हाण, भगवान साकसमुद्रे, ओमप्रकाश बुरांडे, ज्ञानोबा सुरवसे,दत्ताञय काळे,मोहन व्हावळे, जगदीश शिंदे,धनंजय आढाव, सुभाष सवाई, आनंद इंगळे,महादेव रोडे,गोपाळ आघाव, निवृत्ती खाटीक,सिद्धार्थ गवळी,अनिसचे शहराध्यक्ष  विकास वाघमारे,तालुकाध्यक्ष सुकेशनी नाईकवाडे,रानबा गायकवाड,प्रेमनाथ कदम,संजीब रॉय, वैजनाथ कळसकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

No comments:

Post a comment