तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

डॉ.प्रियंका रेड्डी प्रकरणी आरोपीस फाशी शिक्षा देण्याची मागणी. डोणगांव येथे महिलांचे ठाणेदाराना निवेदन.

:


- तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला. या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी डोणगांव च्या ठाणेदार यांना डोणगांव महिला मंडळाच्या वतीने दि. ३ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी ग्रामपंचायत डोणगांव येथे गावातील सर्व महिला जमा झाले आणि कॅंडल मार्च काढुन .प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण करून डोणगांव पोलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले तर
    या निवेदनात म्हटले आहे की,तेलंगाणा राज्यातील शमशाबाद येथे डॉ.प्रियंका रेड्डी या युवतीचा अमानविय अत्याचार करुन निर्घुण खुन करण्यात आला.  या घटनेमुळे संपुर्ण देश हादरला आहे. डॉ.प्रियंका रेड्डीची हत्या ही केवळ तिची हत्या नसून ती मानवतेची हत्या झाली आहे. मानवतेला काळीमा फासला गेला आहे. अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत असल्याने देशातील माता- भगिनींना असुरक्षित वाटत आहे. अशा प्रकरणातील गुन्हेगारांना जो पर्यंत कडक शासन होणार नाही. तो पर्यंत अशा घटना घडतच राहतील. गुन्हेगारांनी गुन्हा करण्यापुर्वी अनेकदा विचार करावा अशी कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. मयत डॉ.प्रियंका रेड्डी यांना न्याय देण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी ही भावना आमचीच नव्हे तर पुर्ण देशाची आहे. सदरील निवेदनाची दखल घ्यावी  अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी डोणगांव ठाणेदार दिपक पवार, सौ. वैशाली अंबेकर, सौ लक्ष्मी मुठाळ, सौ. ज्योती उमाळे, डॉ. सारीका बाजड, डॉ. प्रांजली बाजड, डॉ. सुनिता जुनघरे, सौ. कल्पना पळसकर, सौ. तेजस्विनी खंडारे, सौ. पुनम पळसकर, सौ. अर्चना खंडारे तसेच पंचायत समिती सदस्य निंबाभाऊ पांडव, सरपंच जुबेर खान, हामीद भाई मुल्लाजी, व शिवसेना युवा नेते आबरार खान मिल्ली व इतर 
कार्यकर्ते उपस्थित होते.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment