तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

साखरा येथे हळद पीकवरील करपा रोगाने शेतकरी त्रस्त
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा परिसरातील हळदीच्या पिकांवर करपा रोग पडल्याने या भागातील शेतकरी चिंता ग्रस्त जाले आहेत साखरा हिवरखेडा धोतरा खडकी बोरखेडि या आदी भागातील सोयाबीन तूर कापूस पिकांचे परतीच्या पावसाने नुकसान जाले आहे आत्ता हळद पिकांवर करपा रोग पडल्यामुळे या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे हळद या पिकांवर शेतकऱ्यांची आशा होती या पिकांवरही आत्ता करपा रोग पडल्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे साखरा येथील सुभाष राऊत यांनी आपल्या एका एकर मधे हळद लागवड केली मात्र हळद या पीकमधे पानी साचल्याने त्याच्या शेतातील पूर्ण हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जाले आहे व तसेच मोठ्या प्रमाणात करपा रोग पडल्याने त्याचे फार मोठे नुकसान जाले आहे  या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे या वर्षी खरीप पिकांचे परतीच्या पावसाने फार नुकसान जाले आहे कापूस पिकांवर देखील लाल्या रोग पडला आनि आत्ता हळद पिकांवर  करपा रोग पडल्या मुळे या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत तेज news हेड लाईन ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment