तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

गेवराईचे डाॅ. आतकरे अव्वल; अवघ्या ५२ मिनटांंत केले १० कि.मी. अंतर पार

सुभा

ष मुळे..
----------------
गेवराई, दि. २ _ इंडियन मेडिकल असोसिएशन च्या वतीने रामनगर जवळील बाह्यवळण रत्यावर दि. १ डिसेंबर रविवार रोजी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी १० कि.मी. अंतरात गेवराई येथील डाॅ. भगवान आतकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर डाॅ. दिनकर घुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
           अवयवदानाबद्दल नागरिकांत जनजागृती व्हावी म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने रामनगर जवळील बाह्यवळण रत्यावर दि. १ डिसेंबर रविवार रोजी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. या मॅरेथॉन मध्ये जिल्ह्यातील डाॅक्टरांनी आपल्या कुटूंबियासह सहभाग घेतला होता. पाच व दहा अशा दोन गटात झालेल्या मॅरेथॉनचे उदघाटन जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांण्डेय, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर.बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुखदेव राठोड, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अनिल बारकुल या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. बीड शहरातील नामलगाव फाटा परीसरातील गुरुकुल पब्लिक स्कूल मधुन सकाळी ६ वा. मॅरेथॉनला सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये पाच ते दहा कि.मी. अंतरासाठी स्पर्धक धावले. यामध्ये जेष्ट, तरुण, महिला डाॅक्टरांसह त्यांच्या मुलांनी पण सहभाग नोंदवला होता. 
         यामध्ये गेवराई शहरातील डाॅ. भगवान आतकरे यांनी १८ ते ५० या वयोगटातील १० कि.मी. चे अंतर  अवघ्या ५२ मिनिटात पार करुन प्रथम क्रमांक पटकावला तर डाॅ. दिनकर घुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. डाॅ. सुधीर हिरवे, डाॅ. दिवाकर गुळजकर यांनी सुत्रसंचालन केले तर हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयएमए चे डाॅ. अनिल बारकुले, डाॅ. अनुराग पांगरीकर, डाॅ. सुनिल नाईकवडे, डाॅ. अमोल नाईकवडे, डाॅ. अमोल गित्ते, डाॅ. कल्पना दामा, डाॅ. एकनाथ ढगे, डाॅ. विजय कट्टे, डाॅ. विनोद ओस्तवार, डाॅ. अनिल थोरात, डाॅ. विजय गवते, डाॅ. प्रज्ञा तांबडे, डाॅ. अप्पासाहेब बगलाने यांनी परीश्रम घेतले असुन या मॅरेथॉन मध्ये डाॅ. भगवान आतकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांच्यावर मित्र परिवारासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment