तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 December 2019

ऊर्जेचे आदानप्रदान, कार्यकर्ते ऊर्जा देतात अन नेता प्रेम!
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्याच्या राजकारणात गेल्या एक महिण्यात घडलेल्या घडामोडी, अनपेक्षितरित्या घडलेले सत्तांतर व त्यानंतर स्थापित झालेली महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता या सगळ्या एकूण घटना क्रमामध्ये कायम अग्रस्थानी राहिलेले नाव धनंजय मुंडे! अत्यंत कठीण व टोकाचा संघर्ष करत जिल्हा परिषद सदस्य पदापासून नाथरा ते मंत्रालय असा प्रवास करणारे धनंजय त्यांच्याकडील कार्यकर्त्यांमुळे कायम शक्तिशाली व श्रीमंत समजले जातात.

आज मुंबई येथील मुंडेंच्या बहुचर्चित बी फोर ला नाशिकचा विजय मस्के, एक कॉम्प्युटर इंजिनिअर असलेला परंतु दुर्दैवाने दिव्यांग असलेला एक कार्यकर्ता खास भेटायला आला होता. नाशिकला दिव्यांग बांधवासाठी ते काम करत असतात. धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी त्यांनी त्यांच्या ग्रामदेवतेला साकडे घातले होते. नाशिकवरून येऊन त्यांनी आज मुंबईत आपल्या नेतृत्वाची भेट घेतली. या भेटीच्या तसबीरीने मनाने भावनिक असलेल्या धनंजय मुंडेंच्या सोशल वॉल वर स्थान मिळवले म्हणून हा शब्दप्रपंच!

2002 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील विजयापासूनच चमक दाखवलेल्या मुंडेंना कार्यकर्ता ही खूप मोठी संपत्ती मिळालेली आहे. भावनेने विचाराने जोडलेले असंख्य कार्यकर्ते मुंडेंच्या थेट संपर्कात असतात हे विशेष! त्यांच्याकडील कोणताही कार्यकर्ता कोणत्याही वेळी आपल्या नेत्याशी थेट बोलू शकतो किंवा अडचणीच्या काळी अथवा सामान्य माणसाच्या कामाच्या बाबतीत कधीही कोणत्याही माध्यमाशिवाय संपर्क करू शकतो हे मुंडेंचे वैशिष्ट्य आहे. 

मुंडेही आपल्या कार्यकर्त्यांचे हट्ट बऱ्यापैकी पुरवतात, आपल्या जवळच्या लोकांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील विवाह किंवा अन्य शुभकार्य असोत किंवा कुठलीही दुःखाची किंवा अडचणीची परिस्थिती असो, 'ही इज अल्वेज देअर!' म्हणूनच की काय काही बोटावर मोजण्याइतके अतिस्वार्थी अपवाद वगळता कोणतीही शासकीय आस्थापना ताब्यात नसताना, कारखाने - संस्था ताब्यात नसतानाही मुंडे यांच्या समवेत जोडले गेलेले कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेले उदाहरण नाही! 

यापूर्वीची कोणतीही निवडणूक पहा किंवा काल परवाची राज्यात गाजलेली परळी विधानसभा निवडणूक पहा, आपल्या नेत्यावर प्रचंड विश्वास व प्रेम असलेली मोठी फळी धनंजय यांच्या बाजूने दिवस रात्र झगडताना दिसली. केवळ परळी कींवा बीड जिल्हा नव्हे तर राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मुंडेंचे कार्यकर्ते परळीत ठाण मांडून मुंडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळताना आपण पाहिले आहेत.

*'कोणत्याही राजकारणी व्यक्तीने केवळ टेंडर दिले किंवा चार पैसे कमवून दिले म्हणून कार्यकर्ते जवळ जातात' या आख्यायिकेला पूर्ण चुकीचं ठरवणारं धनंजय मुंडे यांचं वलय आहे.  कोणतीही सत्ता ताब्यात नसताना देखील जीव ओवाळून टाकणारे असंख्य कार्यकर्ते हा त्याचा जिवंत पुरावा आहे.

"त्या कथित व्हीडिओ क्लिप" प्रकरणी धनंजय मुंडे जेव्हा लाईव्ह खुलासा करत होते तेव्हा आपापल्या जागी बसून कित्येकांनी अश्रू ढाळले, आपल्या नेत्यावर असलेलं असीम प्रेम हेच त्यामागचं गमक होतं. धनंजय मुंडे हेसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना खूप वेळ देतात. सोशली अलर्ट व ऍक्टिव्ह असलेले मुंडे व्हाट्सअप्प सारख्या माध्यमावर किंवा फोनवरून अनेक कार्यकर्त्यांच्या कायम संपर्कात असतात. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांप्रमाणे परळी, पुणे किंवा मुंबईत आलेल्या प्रत्येकाला कितीही घाईत असले तरी ते न भेटता कधीही परत पाठवत नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या  'इमोशनल अटॅचमेंट' मागे हेही एक कारण आहे.

आपल्या जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील 118 वर्षांचा एक एव्हरग्रीन कार्यकर्ता, एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आहेत, स्वतःच्या पायावर कोणत्याही आधाराशिवाय चालणारे साहेबराव थोरवे दादा आठवले की 'धनंजयला प्रेरणा द्यायला, मुंबईला भेटायला जाणारा 118 वर्षांचा हा कार्यकर्ता' आठवला की राज्याला एका तासात हलवून सोडायची ताकत असलेल्या नेत्याच्या मनातही प्रेरणा जागी होते अन ऊर्जेने भरलेल्या डोळ्यांचे काठ ओले झाल्याचे स्पष्ट दिसून येतात!

सत्तेच्या बाहेर राहून जीवाला जीव लावणारी एवढी मोठी कार्यकर्त्यांची, कार्यकर्ते नव्हे तर सहकारी (श्री. मुंडे आपल्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता ऐवजी सहकारी हा शब्द वापरतात!) अशा या सहकाऱ्यांची नोंद धनंजय मुंडे यांच्या डोक्यात तोंडपाठ असते, म्हणजे ते नवख्या कार्यकर्ते असतील किंवा एखाद वेळी भेटलेले सोशल चाहते असतील, प्रत्येकाला नावाने, गावाने भेटीतील आठवणीसह ओळखतात हे विशेष. असे नेतृत्वगुण आता लोप पावत चालले असले तरी धनंजय मुंडे यांच्याकडे मात्र याबाबतीत प्रचंड श्रीमंती आहे. असे या ऊर्जेची आदान प्रदान करणारे व प्रेम कमावणारे नेते व कार्यकर्ते यांच्यातील भाव

No comments:

Post a Comment