तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद येथे बदली ; नवीन जिल्हाधिकारी म्हणून प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्तीबीड (प्रतिनिधी) :-   बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची
शासनाने औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती
केली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश सामान्य प्रशासन
विभागाने बुधवारी जारी केले
फेब्रुवारी महिन्यात आस्तिककुमार पाण्डेय यांची अकोला
येथून बीडला बदली झाली होती. त्यांचा बीड जिल्ह्यातील
कार्यकाळ चर्चेत राहिला. त्यांनी केलेल्या वाळू
माफिया विरोधात कारवाई, गौण खनिज वाहतूकीत
पारदर्शकता आणण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न यामुळे चर्चेत
राहिले. आता त्यांची औरंगाबाद येथील महानगरपालिका
आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी
नवीन जिल्हाधिकारी म्हणून यशदा प्रकल्पाच्या संचालिका
प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली आहे.

No comments:

Post a comment