तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 12 December 2019

दाभा सर्कलमध्ये युवा कार्यकर्ते बंडखोरीच्या पवित्र्यात?
सततच्या पराभवाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न 

अनेक ईच्छुक ऊमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग

फुलचंद भगत
मंगरूळपीर-वाशिम जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यापासून जि.प. सभागृहात पोहोचण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असून जिल्हा परिषद निवडणूक रणांगणात नवखे आणि युवा उमेदवार उतरण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत.
 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सुटलेल्या दाभा या जि. प. सर्कलवर आतापर्यंत काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे .एक वेळा भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद काबीज केल्याने सगळ्यात पक्षाकडून तिकीट मिळविण्यासाठी तिकीटार्थीची झुंबड दाभा मध्ये होणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तर्फे मातब्बर आणि अनुभवी उमेदवार इच्छुक असून नागरिकांच्या सुखदुःखात अडीअडचणी मध्ये सदैव धावून जाणारे, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या समस्यांना मोर्चे, आंदोलने करून वाचा फोडणारे अनेक सुशिक्षित आणि युवा कार्यकर्ते यावेळी जनसामान्यांच्या आग्रहास्तव दाभा जिल्हा परिषद सर्कल मधून विविध पक्षाकडून निवडणूक लढवून 'मलाही एक चानस द्या' असे मतदारांना साकडे घालताना दिसणार आहेत.
दाभा जि. प. सर्कलमध्ये त्याचं त्या चेहऱ्यांचा मतदारांना वीट आला असून जिल्हा परिषद सभागृहात आपल्या समस्यांना वाचा फोडणारा, तडफदार, अभ्यासू आणि युवा सदस्य पाठविण्याच्या चर्चा सर्कलमध्ये आतापासूनच रंगू लागल्या आहेत.अनेक वर्षापासुन जनतेंची इमानेइतबारे कामे करणारेही यावेळी निवडणुक रिंगणात ऊतरणार असल्याने मतदारराजा नेमका कुणाला पसंती देतो याची वाट पाहणे ऊचित ठरणार आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206,9763007835

No comments:

Post a comment