तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 3 December 2019

मंगरुळपीर येथे दिव्यांग बांधवांनी दिला रूग्णांना आधार.
फुलचंद भगत
मंगरुळपीर-१९९२ पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दिव्यांग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.दिव्यांग व्यक्तींना केवळ सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा हा या मागचा प्रमुख उद्देश आहे.३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ग्रामीण रूग्णालय मंगरूळपीर येथे रूग्णांना फळ/बिस्किट वाटप करून जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे वाशिम मंगरूळपीर विधानसभा अध्यक्ष श्री.राधेशाम जाधव डाँ.चव्हाण वैद्यकीय अधिकारी,डाँ.जाधव वैद्यकीय अधिकारी,रामेश आडे,डाँ.बोचे,गोपाल मोटे,सुभाष इंगोले,मनोज इंगळे,संजय अंबलकर,विठ्ठल गादेकर,यमुनाताई बेलखेडे,सचिन मांढरे शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड उपस्थित होते.यावेळी डाँ.आडे यांची मनोगत व्यक्त केले.या छोटेखाणी कार्यक्रमाचे संचलन राधेशामजी जाधव यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भिमराव सुर्वे मानले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a comment