तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 December 2019

आई-वडिलांची सेवा जो करतो, तोच खरा भाग्यवान, मृत्यू हे सत्य पण सुखाचा होण्यासाठी शुद्ध कर्माचा मार्ग पत्कारावा-ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर

नाथ (प्रतिनिधी) :-मानवी जीवनात आपण देवाचा शोध घेतो. पण सत्याने शोध घेतला तर आई -वडिल हेच खरे देव असुन त्यांची सेवा जो करतो तोच खरा भाग्यवान. दान धर्म केला पाहिजे. शुद्ध कर्माने वागले पाहिजे. मरण हे अटळ आहे. पण त्यासाठी मार्ग सद्‌गुणाचा, सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा असायला हवा असे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.प्रभाकर महाराज झोल यांनी केले.तालुक्यात वागबेट येथे आयोजित केलेल्या कै.मारोतीराव गित्ते यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त किर्तनात ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब गित्ते यांचे वडिल कै.मारोतीराव यांनी वडिलांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त किर्तन आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या किर्तनासाठी महाराजांनी संत एकनाथ महाराजांचा पक्षी अंगणी येती | ते का गुंतोनी राहती || तैसे असावे संसारी | जोवरी प्राचिनाची दोरी || हा अभंग सेवेसाठी घेतला होता.यावर भाविकांना उद्‌बोधन करताना आई-वडिलांचं महत्व त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र अशी संस्कृती जिथे जिवंतपणी आई-वडिलांची सेवा आणि मृत्युनंतर अन्नदानाच्या माध्यमातुन सेवा होत असलेलं हे जगाच्या पाठीवर हे एकमेव राज्य आहे. मानवी जीवनात खरा भाग्यवान कोण?हे प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा अध्यात्मिक व्याख्यात संसार जीवनात जो आई-वडिलांची सेवा श्रावण बाळासारखी करतो तो खरा भाग्यवान. कारण देव शोधण्याची गरज नाही. आई हे संसाराचं परम वैभव्ा असुन त्याला ज्या घरात जपले जाते त्याचे संसार यशस्वी होतात. जगामधील सारी तिर्थ आई या दोन शब्दांत दडलेली आहेत. जिवंतपणी परोपकाराने वागुन दानधर्म केला पाहिजे. साधुसंतांचा आदर केला पाहिजे.आई-वडिलांची सेवा आणि पंढरीची वारी जो करतो तोच खरा श्रीमंत असल्याचे त्यांनी सांगितलं. जिथे अन्नदान होतं, तिथे देव नांदतो. मग कुठल्याही गोष्टीची कमतरता संसारात भासत नाही. प्रामाणिकपणा, शुद्ध कर्म आणि नितिमत्ता या गोष्टी असतील एवढेच नव्हे तर संसार जीवनात अहंकार बाजुला ठेवुन चंगळवादाची आसक्ती न करता जीवन जगले तर खऱ्या अर्थाने सार्थक होवु शकते. मृत्यु हे तर अटळ आहे. मात्र तो खऱ्या अर्थाने सुखाचा यायचा असेल तर आपण करत असलेल्या कर्माधिष्ठ जीवनावर मृत्युचं येणं सत्य असतं हे त्यांनी सांगितलं. चांगलं बोला, ऱ्हदयी आत्मभाव ठेवा, कुणाची निंदा करू नका, द्वेष्ााने कुणाला बघु नका, समाजात पैशाने प्रतिष्ठा मिळते हा चुकीचा समज असुन सद्‌गुणाच्या आधारावर माणसाला नमस्कार वाढतात असं त्यांनी ठणकावुन सांगितले. संसारात पैसा मिळवणं हे गैर नाही. पण प्रामाणिकपणाची लक्ष्मी आपल्यापासुन दुर जात नाही. बालासाहेब गित्ते यांनी वडिलांच्या पाचव्या पुण्यतिथीला दरवर्षीप्रमाणे अन्नदान करून मरणोत्तर माय-बापांची सेवा सुरू ठेवली. या कार्याचे कौतुक महाराजांनी केलं. कार्यक्रमाला पत्रकार राम कुलकर्णी, माधवराव दहिफळे, मारोतीराव फड, माधवराव होळंबे, मधुकर मुंडे, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, बाबुराव पवार(सावकार), सुभाष फड, नरसिंग सिरसाट, रामा टायर्सचे श्री रावसाहेब आदीसह सम्राट आणि नागनाथ या आजोबाच्या नातवांची उपस्थिती होती. किर्तनासाठी वागबेट व परिसरातुन मोठ्या प्रमाणावर भाविक आलेले होते. अन्नदानाने धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.

No comments:

Post a comment