तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 December 2019

डॉ. संतोष मुंडे यांचा लंडन येथील भारतीय दूतावास (Indian High Commission) मध्ये विशेष गौरवपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांचा लंडन येथील भारतीय दूतावास (Indian High Commission) मध्ये 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गौरव सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कार्याची दखल घेत.डॉ. संतोष मुंडे यांचा विशेष गौरव सन्मानित झाल्याबद्दल  यांच्यावर राज्यभरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर कडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आहे.
   या बाबत अधिक माहिती अशी की, 6 डिंसेबर रोजी परळी येथील डॉ. संतोष मुंडे यांचा लंडन (London)येथे भारतीय राजदूतावसामध्ये (Indian High Commission) विश्वभूषण,भारतरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  विशेष गौरवाने सन्मानीत करण्यात आले. डॉ. संतोष मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकीत मनोगत व्यक्त केले व लंडन येथील प.पु .डाॅ.बाबसाहेब आंबेडकर घरास भेट दिली. देशातील प्रत्येक 23 राज्यातील प्रतिनिधी व इतर चार देशातील प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी  
भारतीय राजदूतावसामध्ये (Indian High Commission) चे डी.प.टी.कमिशनर चरंनजीतसिंग, गौतम चक्रवर्ती, स्टीव्ह हँमन्स, डॉ. अभिजित शिंदे, डॉ. अमरसिंह जमदाडे, डॉ. राज मँडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. लंडन येथील अपंग, शेतकरी, हाँस्पीटल येथेही भेटी देऊन संवाद डॉ. मुंडे यांनी संवाद साधला. परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.धनंजय मुंडे साहेबांनी अभिनंदन केले.  डॉ. संतोष मुंडे यांना लंडन येथे “विशेष गौरव मिळाल्याबद्दल  शैक्षणीक, सामाजिक, राजकीय क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment