तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 December 2019

SC/ST आरक्षण १० वर्षांनी पुन्हा वाढणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णयबुलडाणा :--

  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा आणि राज्यांमधील विधानसभेसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आरक्षण १० वर्षांनी पुन्हा वाढवण्यात आले आहे. याआधी हे आरक्षण २००९मध्ये वाढवण्यात आले होते.आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.केंद्र सरकार हे दलितविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत होता. अशात हे आरक्षण विधेयक मंजूर करणे मोदी सरकारसाठी अत्यंत आवश्यक आहे. शिवाय कुणी या विधेयकाला विरोध करेल अशीही स्थिती नाही. म्हणूनच, हे आरक्षण विधेयक मंजूर होईल हे निश्चित असल्याचे मानले जात आहे.दरम्यान भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३४ नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एससी, एसटी आरक्षण लागू करण्यात आले आहे. परंतु, त्यावेळी हे राजकीय आरक्षण १० वर्षांसाठी लागू करण्यात आले होते. त्यानंचर १० वर्षांनी ते आणखी १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पूर्वी सन २००९ मध्ये यूपीए सरकारने हे आरक्षण १० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता केंद्र सरकारने आरक्षणाच्या कालमर्यादेला मंजुरी दिल्यास ते जानेवारी २०३० पर्यंत लागू होणार आहे.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment