तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 January 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकच्या माध्यमातून उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडली-पो.नि.बाळासाहेब पवारपत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे-सौ.सरोजिनीताई हालगे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतीय राज्यघटनाच लिहिली नाही तर अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य आहे. पाक्षिक मूकनायक  सुरु करुन बाबासाहेबांनी उपेक्षितांच्या आवाजाला वाचा फोडण्याचे काम केले असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करतांना नगराध्यक्षा सौ.सरोजिनीतार्ई हालगे यांनी पत्रकारांनी सत्यता पडताळून वृत्त प्रकाशित करावे असे आवाहन केले. मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे संपन्न झाला. कार्यक्राच्या सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमेला वंदन करुन तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक प्रतिज्ञा देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.सरोजिनीताई हालगे होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. ग्रामिण पोलिस ठाण्याचे पो.नि.प्रदिप त्रिभवन, निवासी नायब तहसिलदार क्षितिजा वाघमारे, पोलिस सहाय्यक निरीक्षक आरती जाधव, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा जाधव, प्रा.दयानंद कुरुडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी अनंत इंगळे यांनी तीन ग्रंथ तर गुरुदास आश्रमाचे दास महाराज यांनी  ग्रामगिता पत्रकारसंघास भेट दिली. 
यावेळी परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणार्‍या पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रा.प्रविण फुटके, धनंजय आढाव, प्रा.राजु कोकलगावे, दत्ता काळे, जगदिश शिंदे, विठ्ठल साबळे यांचा मूकनायक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 
या कार्यक्रमास चेतन सौंदळे, प्रा.विलास रोडे, अनंत इंगळे,  डॉ.ऐश्वर्या जाधव, इंजि.जयवर्धन सुर्यवंशी, फुले आंबेडकर अभ्यासक जयपाल कांबळे, दास महाराज, सुनिल धिमधिमे, बापु गायकवाड, संपादक राजेश साबणे, संजय खाकरे, प्रेमनाथ कदम, धनंजय आरबुने, सचिन वंजारे, अ‍ॅड.कपिल चिंदालिया, महादेव गित्ते आदी उपस्थित होते. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, शहराध्यक्ष संभाजी मुंडे, कार्याध्यक्ष धिरज जंगले, मोहन व्हावळे आनंद तुपसमुद्रे,विकास वाघमारे ,आकाश देवरे,महेश मुंडे व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.   कार्यक्रमाचे प्रस्ताविक भगवान साकसमुद्रे यांनी केले. सुत्रसंचालन रानबा गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन अनंत गित्ते यांनी केले.

तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी
पाथरी:- हिंदू-हदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य युवासेना उपशहर प्रमुख राधे गिराम व शिवसेना शाखा माळीवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने तातुकास्तरीय नृत्यस्पर्धा व सांस्कृतिक स्नेहसंमेलन माळीवाडा येथे २८ जानेवारी रोजी संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उदघाटन युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिपक बाराहाते उपजिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे,रामचंद्र आमले, राहूल पाटील,अविराज टाकळकर,प्रमोद चाफेकर, पं स सदस्य पिंकू शिंदे,राधे गिराम यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी प्रथम पारीतोषिक माळीवाडा शाळेला तर व्दितिय साक्षी गिरी तर तृितिय पारितोषिक ज्योती कांबळे ला मिळाले. या स्पर्धेचे आकर्षण ठरले ते संजय चव्हाव यांच्या मार्गदर्शनात सादर केलेले राजा माणूस हा दिलदार हे खा संजय जाधव यांच्या वर सादर केलेले गीत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धांत चिंचाने यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शिवसेना,युवासेना व माळीवाड्यातील सर्व नवतरुण युवक मित्रांनी परिश्रम घेतले.

विहीर अनुदानासाठी शेतकऱ्यांना लुटले


ग्राम रोजगार सेवका तुषार भामरेचे  कारस्थान 
शासनाने मागेल त्यांना शेततळे मागेल त्यांला सिंचन विहीर योजना अंमलात आणली परंतु ह्या योजनेचा देखील फज्जा च झाला शेतकरी राजाला आपल्या मंजूर झालेल्या विहिरीचे अनुदान मिळवण्यासाठी ग्राम रोजगार सेवकाने मागितलेले पैसे द्यावे लागतात हा प्रकार उघडकीस आला असून ह्याबाबत केंद्रीय समिती लक्ष घालणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळाली. 
सदर प्रकरण धुळे येथील मेहेरगाव गावातील असून नुकतीच त्या विषयी तक्रार नागरिक व शेतकरी ह्यानि केली असून लवकरच सदर ग्रामरोजगार सेवकावर कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच शेतकरी नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात येतील सदर तुषार भामरे ह्यांनी विहीर अनुदान साठी प्रत्येक शेतकऱ्यांनकडून ६० ते ७० हजार रुपये घेतले असल्याची तक्रार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रकरण केंद्रीय भ्रष्टाचार विरोधी आयोग लक्ष घालणार असून सखोल चौकशी सुरू करण्यात येईल असेही ह्यावेळी सांगण्यात आले.

सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व आ.संजय दौंड


परळी मतदारसंघ हा सामाजिक नेतृत्व घडविणारा मतदार संघ म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. या मतदार संघातुन अ‍ॅड.पंडितराव दौंड यांनी प्रतिनिधीत्व करतांना राज्यमंत्री पदही भूषविले. यामुळे परळी मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाली. विशेषता सिंचन क्षेत्रातील अनेक तलावांची निमिर्ती त्यांच्याच कार्यकाळात झाली.  पंडितराव दौंड हे राज्यमंत्री असतांना त्यांचे पुत्र संजय दौंड हे सामाजिक कार्यात सक्रीय होते. तरुण वयापासून त्यांनी मित्र परिवार जोडत सामाजिक कार्याला सुरुवात केली. सर्वसामान्यांच्या समस्या आपल्या या संजयदृष्टीने सोडविणार्‍या संजय दौंड यांच्या पाठीशी हजारो गोर गरीब दिन दुबळ्यांचे अशिर्वाद लाभल्याने त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे दिसते. आजही अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कुठल्याही प्रकारची अडचण आली की, सर्वप्रथम नाव येते ते संजय दौंड यांचे सामाजिक कार्याबरोबरच संजय दौंड यांनी शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान देत असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पट्यात असलेल्या गावांमध्ये शिक्षणाची गंगा संजय भाऊ यांनी आणली. त्यांच्या कार्याबरोबरच त्यांनी आपल्या राजकिय कार्याची सुरुवात ग्राम पातळीवरुन केली. 1992 ते 1997 या कालावधीत घाटनांदूर जि.प.सर्कलचे प्रतिनिधीत्व करुन आपल्या राजकीय कार्याची चुनुक दाखविली. त्यांच्या या समाजभिमुख कार्यामुळे 1997 ते 2002 धर्मापुरी जि.प.सर्कल, 2010-12 पट्टीवडगाव जि.प.सर्कल मधील मतदारांनी आपले नेतृत्व निवडले. याबरोबरच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक वर्ष संचालक म्हणून कार्य करत असतांना शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले. 1 फेब्रवारी 1964 रोजी जन्मलेले संजयभाऊ आज आमदार झाले आहेत. वयाच्या 56 व्या वर्षात पर्दापण करत आहेत. राजकीय क्षेत्रातील आजच्या युवा वर्गापुढे आपल्या कार्याद्वारे आ.संजय भाऊ यांनी आदर्श निर्माण केला आहे. या बरोबरच युवकांना व्यवसनापासुन दुर ठेवत व्यायाम शाळेच्या माध्यमातून सदृढ पिढी घडविण्याचे कार्य संजय भाऊ करत आहेत. माजी मंत्री अ‍ॅड.पंडितराव दौंड यांच्या राजकीय कार्याची पुण्याई व संजय भाऊ दौंड यांचे कार्य यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व पदाधिकारी यांनी या विधानपरिषदेची उमेदवारी देऊन बिनविरोध निवडही केली. संजय भाऊ दौंड यांच्या आमदरकीच्या रुपाने परळी व अंबाजोगाई तालुक्याच्या विकासाची गती आणखी वाढणार असून ना.धनंजय मुंडे व आ.संजय दौंड या जोडगोळीच्या रुपाने परळी मतदारसंघाच्या विकासाची दारे खर्‍या अर्थाने खुली झाली आहेत.
आ.संजय भाऊ यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी सौ.आशाताई दौंड यांचेही तेवढे योगदान मिळत असून आशाताई दौंड यांनी आता पर्यंन्त 2012 ते 2017 पट्टीवडगाव जि.प.गटाचे तर 2017 ते 2022 या कालावधीत धर्मापुरी जि.प.गटाचे प्रतिनिधीत्व केले. या कार्याकाळात जि.प.च्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहित असतांना परळी व अंबाजोगाई तालुक्यातील विकासाच्या अनेक योजना राबविल्या. सामाजिक, राजकिय क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणार्‍या दौंड घराण्यातील आ.संजय भाऊ यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा..

साहेबराव फड
सचिव, अभिनव विद्यालय, परळी वैजनाथ

माजी मंत्री पंडितराव दौंड रमले गावकर्‍यात जुन्या आठवणींना दिला उजाळा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड यांनी मलकापूर येथे सदिच्छ भेट दिली. व गावकर्‍यात रमले तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला.
  माजी राज्यमंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड विधानपदिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांची मलकापुर नगरीतील ही पहिली भेट होती. यावेळी गावकर्‍यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी यांनी 61 वर्षापुर्वीच्या जुनी आठवणी काढुन त्यांना उजाळा दिला. गावकर्‍यांशी सुसंवाद साधला. तसेच मलकापुर मधील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी बोरणा प्रक्लपातुन पाईपलाईनद्वारे पाणी आणूत असे आश्वासन दिले. तसेच गावातील इतर नागरी सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य देऊत असे सांगितले.
यावेळी माणिकराव गित्ते, अण्णासाहेब गित्ते, जिवन गित्ते,  फुलचंद गित्ते, पिंटु गित्ते, सचिन गित्ते, पत्रकार महादेव गित्ते, बाबासाहेब गित्ते, मलकापुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

8 फेब्रुवारी रोजी चांदापुर (ता.परळी) येथे आयोजित 6 व्या अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन


धम्म परिषदेस पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे,आ. प्रकाशदादा सोळंके,आ. संजय भाऊ दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती

धम्म परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा- स्वागताध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार,दि 8 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता सहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म परीषदेची सध्या जय्यत तयारी सुरू असून तयारीसाठी धम्मप्रेमी जनतेने पुढाकार घेतला आहे.या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा),पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर),पुज्य भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद),पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली), पुज्य भिक्खू पय्यारत्न (नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी,चोखामेळा सहकारी सोसायटी वसंतनगर चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्षा बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट,  व परिषदेचे अध्यक्ष अँड अनंतराव जगतकर संयोजक तथा तक्षशीला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवनचे अध्यक्ष चंद्रकांत साधु इंगळे व  प्रा प्रदिप रोडे  आदींनी संयुक्तरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.


तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता.परळी जि.बीड) यांच्या वतीने तालुक्यातील चोखामेळा सहकारी सोसायटी,मौजे चांदापुर,ता.परळी येथे शनिवार,दि 2 फेब्रुवारी 2020 रोजी होणार्‍या सहाव्या बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कालवश शंकरराव जगतकर नगरी येथे संपन्न होणार्‍या सहाव्या धम्म परिषदेची सुरूवात सकाळी 9 वाजता पंचरंगी धम्मध्वजारोहणाने  होईल.यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे
 पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे, आ.प्रकाशदादा सोळंके,आ. संजयभाऊ दौंड,माजी आ. पृथ्वीराज साठे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.या 
बौध्द धम्म परीषदेच्या स्वागताध्यक्षपदी बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट या असणार आहेत.तर अध्यक्षस्थानी आयु.अ‍ॅड. अनंतराव जगतकर (अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी) तर यावेळी धम्मपीठावर परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव, जि.प.सदस्या आशाताई संजयभाऊ  दौंड,प्रा.डॉ.अर्चना कांबळे (कोल्हापुर),नालंदा आकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे,परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक कराड,सरपंच डी.एस.राठोड, सरपंच भामाबाई हानवते, उपसरपंच श्रीहरी गित्ते,प्रा.डॉ. विनोद जगतकर,परळी न.प.चे स्वच्छता समितीचे सभापती किशोर पारधे, स्वच्छता निरिक्षक शंकर साळवे, नगरसेवक नितीन रोडे,  अनंत इंगळे,दत्ता सावंत (परळी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संयोजन समितीने चांदापुर येथे होणार्‍या या धम्म परिषदेची सर्व तयारी पुर्ण केली आहे.वसंतनगर तांडा रस्त्यापासून वृध्द,अपंग व महिला यांना जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी संयोजन समितीचे मुरलीधर कांबळे (बौद्धाचार्य),दिलीप वाघचौरे (बौद्धाचार्य),माणिक रोडे,मधुकर वेडे,व्यंकट वाघमारे, मिलींद नरबागे,राज जगतकर, प्रभाकर बडे,प्रा.बी.एस. बनसोडे,राजाभाऊ घाटे,किशोर इंगळे,चंद्रकांत बनसोडे,संजय साळवे (पुस),सुरेखा रोडे, सुभाष वाघमारे अर्जुन काळे,आकाश वेडे,विनोद रोडे, धनंजय जोगदंड,सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड,रूक्मीण गोरे,लखन सावंत, अर्जुन वाघचौरे बुद्धकरण जोगदंड,संजय सिंगणकर,संजय जोगदंड,श्रीराम वैद्य, प्रसिद्धीप्रमुख प्रा.बालाजी जगतकर यांनी पुढाकार घेतला आहे.तरी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील धम्मप्रेमी जनतेने पांढरे वस्ञ परिधान करूनच धम्म परिषदेस उपस्थित रहावे असे आवाहन तक्षशीला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणचे चंद्रकांत इंगळे,प्रा.प्रदिप रोडे, राजेंद्र घोडके,राहुल घोडके, प्रा.गौतम गायकवाड,सचिन वाघमारे,जगन सरवदे,विश्‍वनाथ भालेराव,सिमा इंगळे आदींनी केले आहे.

गोरगरीबांची काळजी घेणा-या पक्के घर देणाऱ्या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा - पंकजाताई मुंडे


नेरल, बादली, रिठाला येथे जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद ; पदयात्रेतून मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

नवी दिल्ली  (प्रतिनिधी) :- दि. ३१ ----- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरीब जनतेची काळजी घेणारे नेतृत्व आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्या, झोपडीपट्टी धारकांना स्वतःच्या घराचे मालक केले, त्यामुळे गोरगरीबांची खरी काळजी घेणा-या भाजपला दिल्लीत बहुमतांनी सत्तेवर आणा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आज ठिक ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत मतदारांना केले.

     पंकजाताई मुंडे सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौ-यावर आहेत. काल संध्याकाळी त्यांची परवेश रतन यांच्या प्रचारार्थ पटेल नगर येथे सभा झाली. आज दिवसभरात    नरेला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नील दमन खत्री यांच्या प्रचारार्थ बख्तावरपूर येथे, बादली मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार भगत यांचेकरिता स्वरूप नगर येथे, तर रिठाला मतदारसंघाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्यासाठी बुध विहार येथे त्यांची सभा पार पडली. या सभांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव याठिकाणीही पहायला मिळाला. सकाळी पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी युवा व ज्येष्ठ मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचेशी संवाद साधला व भाजपा उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. 

   ठिक ठिकाणी झालेल्या सभांना संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष नड्डाजी व गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार मी याठिकाणी प्रचारासाठी आले आहे. सामान्य, गरीब व वंचित घटकांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर काम केले, तेच काम पंतप्रधान मोदी करत आहेत. दिल्लीत झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची घरं देण्याचे वचन त्यांनी पूर्ण केले. ४० लाख अनाधिकृत घर त्यांच्या मालकीची केली, उज्ज्वला गॅस असेल किंवा वीज पुरवठा करणारी सौभाग्य योजना असेल, अशा कितीतरी चांगल्या योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे पंतप्रधान नव्हे तर प्रधानसेवक मानतात, जनतेचे कल्याण करण्याबरोबरच राष्ट्रभक्तीची भावना त्यांनी जोपासली. एकीकडे मोदींसारखे कणखर नेतृत्व आपल्याला लाभले असताना दुसरीकडे आम आदमीचे नांव घेऊन सरकार चालवणा-यांनी कोणतीच वचनं पूर्ण केली नाहीत, दिल्लीतील प्रदुषण आणि गुन्हेगारी कमी करण्यात इथले सरकार अपयशी ठरले आहे, या निवडणुकीत हे झाडूवाले सरकार दूर सारून गरीबांचे हित पाहणा-या भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

प्रसिद्धीसाठी पंकजाताईवर अब्दुल सत्तारांची टिका, मराठवाड्यासाठी मंजुर केलेली वॉटरग्रीड योजनेला स्थगिती मिळाली तर सत्तार पदाचा राजीनामा देणार का?-भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवालअंबाजोगाई(प्रतिनिधी) :-पंकजाताई मुंडे राज्यात सत्तेवर असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडुन मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड सारखी भव्य योजना मंजुर केली. जलयुक्त शिवारांच्या माध्यमातुन त्यांनी ग्रामीण भागात सिंचनाची क्रांती केली. अठरा विश्र्वे दारिद्रय आणि दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला पुन्हा संकटाचा सामना करण्याची गरज भासु नये म्हणुन भाजप सरकारने मंजुर केलेल्या योजना महाआघाडी सरकार स्थगिती देवु लागलं. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजप नेत्या पंकजाताईनं एक दिवसाचं उपोषण केलं. खरं तर केवळ जनकल्याणासाठी मराठवाड्याची कन्या जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा मराठवाड्यातीलच नेते जर भुमिकेला राजकिय दृष्टीकोनातुन नाव ठेवीत असतील आणि केवळ प्रसिद्धीसाठी पंकजाताईवर टिका करत असतील तर हे जनतेचे दुर्दैव असुन राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची टिका केवळ प्रसिद्धीसाठी आहे. आम्ही केलेली वॉटरग्रीड योजना त्यांनी सुरू ठेवुन दाखवली तरी बस अशा प्रकारचा खोचक सवाल भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सत्तारांच्या टिकेला उत्तर देताना केला आहे. 
पंकजाताईच्या उपोषणावर राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी नाशिक येथे केलेल्या टिकेला उत्तर देताना प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणाले की, पंकजाताईवर टिका केली की प्रसिद्धी मिळते हे आता राजकारणात नवं समीकरण तयार झालं आहे. मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर त्यांनी गेल्या चार वर्षापासुन विशेष लक्ष घातलं. जलसंधारण खात असताना जलयुक्त शिवाराची सर्वाधिक कामे मराठवाड्यात केली. एवढेच नव्हे तर कोकणात वाहुन जाणारं पाणी आणि पश्चिम दऱ्यातुन समुद्रात वाहुन जाणारं पाणी मराठवाड्यात आणलं पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय केला. एवढेच नव्हे तर तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर यांच्यासोबत वॉटरग्रीड सारखी योजना मराठवाड्यात राबवण्यासाठी वीस हजार कोटी रूपये सरकारकडुन मंजुर करून आणले. हक्काचं पाणी जायकवाडीच्या वरून मराठवाड्याला मिळायलाच हवं यासाठी त्यांनी सत्तेत असताना केलेला प्रयत्न ज्याचे परिणाम योजना मंजुरीतुन दिसुन येतात. राज्यात सत्तांतर झाले आणि ठाकरे सरकार फडणवीस सरकारच्या सर्व योजनेला स्थगिती देवु लागले. पुन्हा हे संकट मराठवाड्यातील जनतेवर येवु नये म्हणुन सरकारकडुन अपेक्षा करताना पंकजाताईनं एक दिवसाचं उपोषण औरंगाबादेत केलं. खरं तर जनकल्याणाच्या प्रश्नावर एक महिला पुढे येते तेव्हा मराठवाड्यातील जबाबदार पुढाऱ्यांनी या प्रश्नावर तरी सहमतीनं सोबत यायला हवं. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी उपोषणा आड अब्दुल सत्तारसारखे मंत्री टिका करून तोंडसुख घेवु लागले याचं नवल वाटतं हा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल औरंगाबादेत विकासकामाचा आढावा घेताना वॉटरग्रीडसारख्या योजनेला गुंडाळुन ठेवण्याचे संकेत दिले. अब्दुल सत्तार यांना जर खऱ्या अथर्ाने आपल्या भागाविषयी काही देणंघेणं असेल तर ही योजना स्थगित होवु नये यासाठी प्रयत्न केलेला बरे.

जागतिक सुर्यनमस्कार दिवसाचे आज आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर होणार कार्यक्रम


   बुलडाणा, दि. 31 :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व क्रीडा भारती यांचे संयुक्त विद्यमाने, सामुहिक सुर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.45 ते 8.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदान येथे करण्यात येणार आहे.
      जागतीक सुर्यनमस्कार दिनाचे आयोजनासंदर्भात दि.30 जानेवारी 2020 रोजी जिजामाता प्रेक्षागार मैदानवरील कक्षात सभा पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे,क्रीडा भारतीचे श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ आयचीत, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे  प्रशांत लहासे, बी.डी.सावळे, सौ.अंजली परांजपे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, पी.आर.वानखडे तसेच योग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
      जागतिक सुर्य नमस्कार दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच सर्व लोकप्रतिनिधी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी, एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पतंजली योग समिती, योग विद्या धाम, आर्ट ऑफ लिव्हींग, आरोग्य भारतीचे सर्व पदाधिकारी तसेच शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, औद्योगीक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी, समाजकार्य, आयुर्वेदीक महाविद्यालय, पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्ग, क्रीडा मंडळे, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सर्व योगप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
   तरी बुलडाणा शहरातील सर्व योगप्रेमी नागरीकांनी, खेळाडूंनी, अधिकारी, कर्मचारी यांनी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे सकाळी 7.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी  केले आहे.
******
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण मिळणार
इयत्ता पहिलीपासून ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणाचा समावेश
   बुलडाणा, दि. 31 : राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार विजाभज, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, इमाव व विमाप्र कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या उत्थानासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण न घेतल्यामुळे मागे राहू नये, यासाठी शासनाने दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळण्याकरीता शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
   धनगर समाजातील विद्यार्थ्यांना दरवर्षी जवळच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत यामुळे शिक्षण घेता येणार आहे. इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता 12 वी पर्यंत या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. भटक्या जमाती – क प्रवर्गातील विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्त्या यांची मुले व दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील मुलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालयाशी संपर्क साधावा. योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
                                                                        *******
ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरोथॉन स्पर्धेनिमित्त बुलडाणा ते खामगांव मार्गावरील वाहतुकीत बदल
 बुलडाणा, दि. 31 : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स व रनबडीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बोरखेड फाटा ते बोथा खामगांव रस्त्याने आयोजीत आहे. या स्पर्धेनिमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते 11 या कालावधीत बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव या रस्त्यावरील वातुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  
    मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 अन्वये जिल्हाधिकारी यांनी  बुलडाणा-वरवंड-बोथा-खामगांव रस्त्यावरील वाहतूक दि. 2 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 5 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविली आहे. सध्याच्या प्रचलित मार्गानुसार  बुलडाणा-वरवंड- बोथा- खामगांव  या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्ग बुलडाणा-वरवंड-उंद्री- खामगांव, बुलडाणा-मोताळा-नांदुरा-खामगांव आणि बुलडाणा-मोताळा-तरवाडी-पिंपळगांव राजा-खामगांव या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 131 अन्वये उचित कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                                    *******
केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी कागदपत्रे सादर करावीत
*6 मार्च 2020 पर्यंत मुदत
 बुलडाणा, दि. 31 : सामान्य प्रशासन विभागाच्या 13 मार्च 2019 च्या शासन निर्णयाअन्वये राज्यातील केंद्र शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन धारकांना 1 जुन 2004 ते 31 जानेवारी 2019 पर्यंतची त्या –त्या वेळी देय असलेल्या दराने थकबाकी अदा करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील जे केंद्र शासन निवृत्त वेतन धारक शासनाकडून अतिरिक्त 500 रूपये बँकेमार्फत परस्पर निवृत्तीवेतन घेतात. तसेच जे केंद्र शासन निवृत्ती वेतन धारक आज रोजी हयात नाहीत, अशा केंद्र शासन निवृत्ती वेतन धारकांच्या कायदेशीर वारसदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत 6 मार्च 2020 पर्यंत कागद पत्रांसह अर्ज सादर करावा.
   या कागदपत्रांमध्ये केंद्र शासन निवृत्तीवेतन धारक यांचे हयातीचे प्रमाणपत्र, केंद्र शासन निवृत्ती वेतनधारक हयात नसतील, तर मृत्यू प्रमाणपत्र व त्यांचे कायदेशीर वारसदार असल्याचे प्रमाणपत्र, निवृत्तीवेतन मंजूरी आदेशाची प्रत, सदर निवृत्तीवेतन कधीपासून निवृत्तीवेतन घेत आहेत याबाबतचा पुरावा व दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक आदींचा समावेश आहे. तरी कागदपत्रांसह अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ****
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज जळगांव जामोद येथे आयोजन
  बुलडाणा, दि. 31 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 रोजी आशा पंचायत समिती सभागृह, जळगांव जामोद येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय मुलांचे निरीक्षणगृह / बालगृह अधिक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                         

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर ते रंगमंच गाजवतील- फुलचंद कराड

संत भगवानबाबा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी वेगवेगळ्या प्रकारच्या कला दिसुन येतात या कलागुणांना योग्य वाव मिळाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठलाही रंगमंच गाजवतील असे प्रतिपादन भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले.श्री संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पांगरी कॅम्पच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
   परळी तालुक्यातील ग्रामीण भागात शैक्षणीक क्षेत्रात नावाजलेल्या श्री संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पांगरी कॅम्प ता. परळी वैजनाथ येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले. काल माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध बाल खेळ, नाटक ,प्रबोधन पर नाट्य , देशभक्तिपर गाणी, शेतकऱ्याच्या व्यथा माडनारे गाणे सादर केले या वेळी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, गटशिक्षणाधिकारी  गणेश गिरी, श्रीमती अन्सारी मॅडम, शेळके साहेब, शाळेचे मुख्याध्यापक घुले सर, अंगदराव कराड, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे, प्रवीण कराड सर,माणिक मुंडे, माजी सरपंच दत्तराव गित्ते, महादेव कराड, श्रीनिवास मुंडे,गोविंद मुंडे, कल्पेश गर्जे,प्रशांत कराड, शरद गित्ते,राजेभाऊ मुंडे, डॉ.गुंजकर, मदन मुंडे ,प्रसाद कराड, गोविंद मुंडे, इंद्रमोहन मुंडे यांच्या सह सर्व पालक व आजी माजी विध्यार्थी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचे भाषण झाले.
 या स्नेहसंमेलनात लहान मुले तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स केले यावेळी मोठ्या संख्येने  विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते या वेळी शाळेतील शिक्षक कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे कौतुक केले. सुत्रसंचालन विद्यार्थी वस्तीगृहाचे अधिक्षक मल्हारराव होळकर व सचिन रणखांबे यांनी प्रस्ताविक आर.एल.घुले तर डी.एन.कोपनर यांनी आभार  मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

         
नव्या-जुन्या गाण्यांच्या तालावर थिरकली चिमुकल्यांची पावले
  या वार्षिक स्नेहसंमेलनात संत भगवानबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झिंग झिंग झिंगाट,कुण्या गावाचं आलं पाखरु,राधा तेरी चुनरी,भक्त पुंडलिकासाठी,अशा नव्या-जुन्या गाणे व गवळणीच्या तालावर उत्कृष्ठ नृत्य सादर केली या स्नेह संमेलनाचे प्रास्ताविक मु.अ.आर.एम.घुले तर सुत्रसंचालन सचिन रणखांबे यांनी केले.विद्यार्थ्यांच्या या गाण्यांना उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय ही माझी कर्मभूमी तर तेथील कर्मचारी हे माझे कुटुंबिय


                                      - माजी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे
(मुंबई प्रतिनिधी-अनुज केसरकर)
       मुंबई, दि. 30 : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय ही माझी कर्मभूमी आहे. हे कार्यालय माझ्यासाठी एक कुटुंब होतं आणि कुटुंबातील प्रत्येक घटकाची काळजी घेणे ही माझी जबाबदारी होती, असे मी समजतो. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीने मला साथ दिली म्हणून मी माझा कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करु शकलो, त्याबद्दल सर्वांचे आभार, अशा भावपूर्ण शब्दात मुंबई शहर जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी तथा सचिव शिवाजी जोंधळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल श्री. जोंधळे यांना निरोप व नुतन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे स्वागत असा छोटेखानी कार्यक्रम एशियाटिक लायब्ररीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. निवतकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून अपर मुद्रांक नियंत्रण सुरेश जाधव होते.   सत्कारास उत्तर देताना श्री. जोंधळे म्हणाले, मुंबई शहर जिल्ह्यात काम करत असताना सुधारण्यासाठी भरपूर वाव होता. तथापि काम करण्यामध्ये मनुष्यबळ कमतरता व मानसिकतेचा अभाव सुरवातीस जाणवला. मात्र अगदी कार्यालयीन स्वच्छतेपासून सुरुवात केल्यानंतर अमुलाग्र बदल झाला आणि केवळ 29 कोटी वसूली असलेल्या जिल्ह्यात जवळपास 500 कोटीपर्यंत वसूली करण्यात आम्ही यशस्वी झालो. या कामी जुन्या सहकाऱ्यांसोबतच युवा कर्मचाऱ्यांनी देखील झपाटून साथ दिली. लोकसभा, विधानसभा दोन्हीही निवडणुकांमध्ये आमचे टिमवर्क उत्तम राहिले, त्यामुळे निवडणुका सुरळीत संपन्न झाल्या. या सर्व कालखंडात सर्वांकडून बरेच काही शिकण्यास मिळाले. कामासोबतच त्यांनी दिलेली प्रेमाची शिदोरी मला पुढील कालखंडासाठी उपयुक्त ठरेल.
   नुतन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी तालुका ते मंत्रालय अगदी मुख्य सचिव व मुख्यमंत्री कार्यालय अशा सर्वच ठिकाणी काम केले असल्याने त्यांचा अनुभव निश्चितच जिल्ह्यातील कामकाज सुकर होण्यास उपयुक्त ठरेल आणि मुंबई शहर जिल्ह्याचा नावलौकिक अधिक वाढेल, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
प्रत्येक शासकीय कागदास न्याय द्यावा-राजीव निवतकर*
    मुंबई शहर जिल्ह्याचे नाव राज्यात चांगले आहेच. ते आणखीण वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कार्यालयातील सर्वांनी जी साथ शिवाजी जोंधळे साहेबांना दिली तशीच सर्वांची साथ मला हवी आहे. शासकीय कार्यालयात आलेला प्रत्येक कागद हा महत्वपूर्ण असून त्यामागे किमान एक व्यक्ती असतो. त्यामुळे आलेल्या प्रत्येक कागदास सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी न्याय द्यावा असे आवाहन नुतन जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर यांनी केले.
कविवर्य सुरेश भटांच्या *‘जे लोक होते वेगळे घाईत, जे गेले पुढे... मी मात्र थांबून पाहतो मागे, कितीजण राहिले’* या काव्यपंक्तींचा आधार घेत त्यांनी प्रत्येकाच्या अडीअडचणींबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
 अपर मुद्रांक नियंत्रण सुरेश जाधव यांनी श्री. जोंधळे यांची ओळख 4 दशकांपूर्वीची असल्याचे सांगून श्री. जोंधळे हे उत्तम बास्केटबॉल खेळाडू असल्याची नवी ओळख सांगितली. ग्रामीण भागातून आलेले हे व्यक्तीमत्व अतिशय शिस्तबद्ध, सर्वांना न्याय देणारे व मनमिळावू मित्र असल्याचे ते म्हणाले  श्री. निवतकर यांच्या हस्ते श्री. जोंधळे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.  अपर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी रविंद्र हजारे, सुषमा सातपुते, लिपिक संवर्गातील श्री.वळसंगे, राजीव डवरी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
 यावेळी उपजिल्हाधिकारी तरुणकुमार खत्री, दीपक क्षीरसागर, श्रीमती स्वाती कार्लेकर, महेश इंगळे, बाळासाहेब वाघचौरे, तेजस समेळ, श्री.कृष्णमुर्ती, तहसिलदार श्यामसुंदर सुरवसे, श्री. सामंत, तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनिल सिरस्कर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधनअरुणा शर्मा


पालम :- शहरातील नगरपंचायतीचे नगरसेवक सुनिल प्रभाकर सिरस्कर यांना दि. 30 जानेवारी रोजी दुपारी पाचच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.
     शहरातील वार्ड क्रमांक 17 चे नगरसेवक सुनिल सिरस्कर यांना  वयाच्या 30 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळ्यांनी त्यांचे उपचार आगोदरच निधन झाल्याची घटना घडली आहे. पालम शहरात घडलेल्या घटनेची माहिती कळताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली व श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, बहिण, वहिनी असा मोठा परिवार आहे. व अंत्यसंस्कार दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता हिंदू स्मशानभूमी फळा रोड पालम येथे होणार आहे.

मूकनायक: व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस


-प्रा.सिद्धार्थ तायडे,संशोधक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.9822836675
........................................

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश जगातील सर्वश्रेष्ठ अशा विचारवंत आणि सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वोतोपरी कार्य करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये होतो. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षितांना केवळ जगण्याची शक्ती दिली नाही तर त्यांना आत्मभानही दिले.या आत्मभानातून उपेक्षित-वंचितांना आत्मविश्वास प्राप्त झाला. जगण्याची नवी ऊर्मी, नवी ऊर्जा प्राप्त झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती अद्वितीय आणि अदभुत अशी आहे. ही क्रांती घडवून आणण्यासाठी त्यांना अखंड परिश्रम करावे लागले. उपेक्षितांचे जीवन त्यांच्या वाटेला आले होते. पण या परिस्थितीवर मात करण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती त्यांच्याकडे होती. हे करताना त्यांनी संपूर्ण भारतीयांच्या सर्वांगीण उत्थानाचा हिमालय उचलण्याचा निर्धार आणि निश्चय केला. मूकनायक सारखे मुखपत्र सुरू करून त्यांनी सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय लिहिला.
आंबेडकरी चळवळीच्या मुखपत्राचे सध्या शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी एखादे वृत्तपत्र, मासिक, नियतकालिक, अनियतकालिक अथवा पाक्षिकसुद्धा काढणे खूप अवघड होते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ पाक्षिक काढले. ती अस्पृश्‍य समाजाची गरज होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडायची होती. त्यांच्या भणंग आयुष्याला नवी कलाटणी द्यायची होती. नवचैतन्य पेरायचे होते. अस्पृश्‍य समाजाची दशा पालटायची होती. दिशा द्यायची होती. अस्मिता नि अस्तित्व बहाल करायचे होते. ही निकड लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी काढला. 
मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना उघडपणे संपादकपदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकपदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील तेरा अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र  महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती.
या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालिन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकिय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. ५ जुलै १९२० रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर ३१ जुलै १९२० पासून मूकनायकाचे संपादक पद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले.
बाबासाहेबांनी सुरू केलेले दोन पाक्षिके मूकनायक व बहिष्कृत भारत बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते, तीची अवस्था पंख तूटलेल्या पक्षाप्रमाणे होते." या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणिव निर्माण करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर बिरुदावली म्हणून संत तुकारामांच्या खालील ओव्या छापल्या जात असे.

काय करुन आता धरुनिया भीड |
नि:शक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण |
सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||
पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली. 
"आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना पर्वा नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये."
मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हा ही मजकूर पुढीलप्रमाणे होता — "हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही."

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले.  मूकनायक उपेक्षित वर्गाचा आवाज आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार-आवाज या मुखपत्रात  मांडला. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल असा निर्धार त्यांनी केला.
 वृत्तपत्राचा समाज परिवर्तनाचे अमोघ अस्त्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापर केला. मूकनायक पासून त्यांनी सुरु केलेला पत्रप्रपंच बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत वाढविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांनी दलित समाजाची अस्मिता जागृत करून विचार प्रवृत्त केले. त्यामुळेच सामाजिक परिवर्तनाचा लढा उभा राहिला.

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे दिल्लीत

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या एकाच दिवशी तीन जाहीर सभा ; महिला मेळाव्यातही करणार मार्गदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) :-  पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे हया दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दुपारी दिल्लीकडे रवाना झाल्या. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी एकाच दिवशी त्यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत.

  दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रातील दहा दिग्गज नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यात केंद्रीय नेतृत्वाने स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांचाही समावेश केला आहे. एक आक्रमक नेता म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते, आपल्या अभ्यासू व दमदार भाषणाने त्या दिल्लीतील मतदारांची मनं जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या ८ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून ११ तारखेला मतमोजणी होणार आहे.

   दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी पंकजाताई मुंडे आज दुपारीच दिल्लीला रवाना झाल्या. त्यांच्या प्रचाराची सुरवात आजपासूनच झाली. संध्याकाळी ८ वा. पटेल नगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रवेश रत्न यांच्या प्रचारार्थ पटेल नगर येथे त्यांची सभा होणार. उद्या ३१ तारखेला दुपारी १२ वा. नरेला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नील दमन खत्री यांच्या प्रचारार्थ बख्तावरपूर येथे, दुपारी ३ वा. बादली मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार भगत यांचेकरिता स्वरूप नगर येथे, तर संध्याकाळी ६ वा. रिठाला मतदारसंघाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्यासाठी बुध विहार येथे त्यांची सभा होणार आहे. १ व २ फेब्रुवारी रोजी पंडित पंत मार्ग नवी दिल्ली येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक प्रचारासाठी त्या ४ फेब्रुवारी पर्यंत दिल्लीत असणार आहेत अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.

जात-धर्म विसरून सरकारला ढासळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीवर प्रश्न विचारा-डाॅ राजेश इंगोले


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-
   अमित शाह आणि नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीवेळी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तंत्र वापरायचे, तेच तंत्र ही जोडगोळी देशभर वापरत आहेत. त्यामूळ सर्वांनी आपले डोके ठिकाणावर ठेवत धर्म बाजूला सारून सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत चाललेली बेरोजगारी, संपत चाललेल्या सरकारी नोकऱ्या यावर प्रश्न विचारायला हवेत असे आवाहन प्रसिध्द मानसरोग तज्ञ डाॅ राजेश इंगोले याने केले. सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साकळी धरने आंदोलनात मंगळवारी डाॅ इंगोले बोलत होते.

शहरातील संविधान संरक्षण भुमी नेहरू चौक तळ  मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या सत्रात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके, वृत्तसंपादक दत्तात्र्य काळे, ओमप्रकाश अप्पा बुरांडे, नगर सेवक शरद भाऊ मुंडे, संजय आघाव, विठ्ठल दंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष पी एस घाडगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ इंगोले म्हणाले अर्थव्यवस्था ढासळत असताना देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए लागू केला आहे. याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. यावेळी मुफ्ती अशफाक यांनी मुस्लिम समुदायाने या कायद्यांविरोधातील आंदोलने गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर राहूनच करावीत असे आवाहन केले.

प्राचार्य बी.डी. मुंडे यांना पितृशोक ; ज्ञानोबा मुंडे यांचे निधन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

तळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक ज्ञानोबा तुकाराम मुंडे यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी 4:30 वा. निधन झाले ते जवाहरलाल नेहरु महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. बी.डी. मुंडे यांचे वडील होत. ते 80 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.


    त्यांच्या पार्थिवावर  दि 31 जानेवारी शुक्रवार सकाळी  8:00 वा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते धार्मिक वृत्तीचे व  मनमिळावू असल्याने पंचक्रोशीत त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंडे परिवाराच्या दुःखात तेजन्यूज परिवार सहभागी आहे.

श्री. संत जगमित्र मंदिर परिसराला भाविकांच्या गर्दीने अक्षरशः जत्रेचे स्वरूप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी वैजनाथ  येथील संत श्री जगमित्र महाराज मंदिरात ह.भ.प.गोवर्धन महाराज देहू आळंदीकर यांचे कीर्तन आज बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी संपन्न झाले. संत जगमित्र मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीस सुंदर व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.  यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेऊन  महाप्रसादाचा लाभ घेतला. जगमित्र मंदिर परिसराला भाविकांच्या गर्दीने अक्षरशः  जत्रेचे स्वरूप आले होते.

श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित "अन्नछत्र" ला श्री राधाकृष्णजी महाराजांनी दिली भेट

"भुखे को भोजन,प्यासे को पानी!
यही है प्रभू भक्ती,ये मेरे मन ने मानी"


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या श्री अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित "अन्नछत्र" ला गोवत्स प.पू.श्री.राधाकृष्णज महाराजांनी भेट दिली.प्रारंभी त्यांनी अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन पूजन केले.ट्रस्ट कडून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती त्यांना यावेळी संचालकांकडून दिली गेली.ट्रस्टच्या वतीने महाराजांचे स्वागत करण्यात आले.

अन्नदान श्रेष्ठदान या तत्वावर कार्य करणाऱ्या अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याबद्दल आपला लेखी अभिप्राय नोंदविला यामध्ये
"भुखे को भोजन,प्यासे को पानी!
यही है प्रभू भक्ती,ये मेरे मन ने मानी" स्वछता,सुंदरता,मनातून या तत्वांवर अन्नछत्रात येणाऱ्या भुकेल्यांची ट्रस्टमार्फत केली जाणारी सेवा अभिनंदनीय आहे.हे पाहून माझ्या  मनाला आनंद वाटत आहे.अन्नछत्राची ही सेवा अविरत राहो.या सेवेत आपले योगदान देणाऱ्या सगळया कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असे महाराजांनी म्हटले आहे.यावेळी ट्रस्टचे संचालक अनिल लाहोटी,संजय स्वामी,के.उपाध्याय,उमेश टाले,गोपाल लाहोटी,किशोर फापट,मुकेश कलंत्री,शिवराज उदगीरकर,राकेश चांडक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

वाल्मीक आण्णा कराड... झिरो ते हिरो पर्यंतचा वादळी प्रवास. वाढदिवसाच्या निमित्ताने एक सिंहावलोकन!
"जया अंगी मोठेपण तया यातना कठीण"
लहानपणीचा उनाड,खोडकर, टुकार मुलगा भविष्यात गावाचा आणि तालुक्याचा सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा आदर्श मानदंड असेल हे त्यावेळच्या वर्तमानाला समजलं नसावं.एखाद्या दगडातून सुरेख मूर्ती घडवायची असेल तर त्या दगडावर पाथरवट हातोडयाने छन्नीचे  घाव घालत असतो. पडणारे घाव सहन केल्यानंतर त्या दगडातून मूर्ती साकार होते आणि त्या दगडाला देवपण प्राप्त होत आणि नंतर समाज त्या मूर्तीच्या पाया पडत असतो."टाकीचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नाही" या न्यायाने जीवनात यशस्वी होण्यासाठी यातना,कष्ट भोगावेच लागतात.उपहास, संघर्ष आणि विरोध या तीन कसोटीतुन सत्याला  जावंच लागतं. जर यश विनासायास अल्पवेळेत मिळालं तर ते यश फार काळ टिकत नसतं तर त्यातून विधायकता कमी  आणि विध्वंसकताच होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संघर्षातून,कष्टातून मिळालेलं यश चिरकाल टिकतं. असचं काहीसं वाल्मीक कराड यांच्या बाबतीत ही घडलं."वाल्मीक आण्णा कराड" नावाचं यशोशिखर दिसत असलं तरी कधीकाळी रक्ताच्या नात्यांनीही दूर केलेल्या वाल्मीक यांना स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी सुध्दा फार कष्ट आणि संघर्ष करावा लागला आहे.आज ज्या स्थानावर आण्णा आहेत,त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीसोबत अनामिक संबंध आणि नाते जोडण्याचा प्रयत्न अनेक जण करताना आपल्याला दिसतात. पण अडचणीच्या काळात जे नातेवाईक होते त्यांनी सुद्धा नाते तोडली होती.पण आज अण्णांच्या मनांत त्यांच्या बद्दलसुद्धा कुठलीही प्रतिशोधाची भावना नाही.याउलट त्यांच्या संबंधी परोपकारी वृत्तीआणि आदराची भावना आहे.
       "वाल्याचा वाल्मीक ऋषी"झाल्याचं आपण पुराणांत ऐकतो वाचतो.उनाड,टुकार,भांडखोर बऱ्याच दूषणांनी युक्त असणारा तत्कालीन वाल्मीक यांनी मुंडे घराण्यातील प्रत्येक व्यक्ती साठी योगदान दिल आहे.सुरवातीच्या काळात पडेल ते काम करून स्व. मुंडे साहेबांसाठी कॉलेजच संघटन आणि राजकारण,कॉलेज च्या निवडणूकीवेळी झालेल्या गोळीबारात मांडीतून बंदुकीची गोळी आरपार गेली.तो काळ रक्तरंजित राजकारणाचा.त्यांचेवर भरपूर जीवघेणे हल्लेही झाले.कार्यकत्यांच्या शिव्या खाव्या लागायच्या, अपमान तर पाचवीलापुजलेलाच.अलीकडच्या काळात राजकारणातले नाजूक निर्णय, एखाद्याला न्याय देण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो हा राजकारणाचा नियमच आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांचा येणारा रोष, आणि बेजबाबदार कामाची जबाबदारी घेऊन टीकेचा धनी व्हायचं आणि लोकांचा रोष स्वतः घ्यायचा आणि समाजाच्या दृष्टिकोनातून खलनायक बनून राहायचे.आपल्या नेत्यावर कार्यकर्ते, जनता नाराज होऊ नये म्हणून अन्नाच कार्यकर्ते आणि जनतेसमोर खलनायक होतात पण आण्णा खलनायक नाही तर नायक आहेत आपल्या नेत्यासाठी.अण्णांना जवळून पाहताना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात हे सर्व मुंडे घरण्यावरील निष्ठा आणि प्रेमामुळे  निमूटपणे सहन करायचं. 
   "स्वामीकाज गुरुभक्ती|पितृ वचन सेवा पती||
हीच विष्णूची महापूजा|अनुभव नाही दुजा||
अर्थात,नोकरासाठी मालकाचं काम, शिष्यासाठी गुरुची भक्ती,मुलांसाठी पित्याचे वचन, आणि स्त्री साठी पतीची सेवा हे  सर्व कार्य म्हणजेच देवाची पूजा, भक्ती असते.स्वामीकाज निष्ठेने करत गेल्यामुळे पुढे जि.प.उपाध्यक्ष असताना धनंजय मुंडे साहेबांचे राजकीय सारथी झाले ते अद्याप पर्यंत.आज रोजी ते परळी न.प.चे गटनेते आहेत.पांगरी गावची ग्रा. प.त्यांच्याच ताब्यात आहे. परळीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत वाल्मीक अण्णांचा शब्द प्रमाण आहे.ही गरुड भरारी... शून्यातून.

परळीच्या राजकीय आखाड्यातला वस्ताद...

आखाडा म्हटलं की समोर कुस्तीच चित्र उभं राहतं.कोणता पठ्ठा कोणत्या डावात निपुण आहे,कोण किती कसरत करतो, कुणाला कोणता अन किती खुराक द्यायचा,कुणाची पकड चांगली आहे, कुणाची क्षमता किती,कुणाची कुस्ती कुणासोबत लावायची अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती जशी आखड्यातल्या उस्तादाला असते,तशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक परळीच्या राजकीय आखड्यातली माहिती वाल्मीक आण्णांना आहे.कोणता कार्यकर्ता किती ताकतीचा,त्याची क्षमता काय, त्याला काय आणि किती खुराक द्यायचा,कोणता डाव कुणाला शिकवायचा, तो कुणावर टाकायचा?कुणाला किती कसरत करायला लावायची?कुणाला जवळ तर कुणाला लांब ठेवायचं?कुणाची काय पात्रता याची अण्णांना अचूक माहिती आहे एवढंच नव्हे,स्वकीया प्रमाणेच परकीयांचे(विरोधकांचे)बलस्थाने आणि कच्चे दुवे अण्णांना माहिती असल्यामुळे योग्य प्रसंगी प्रसंगावधान राखून योग्य डाव टाकून विरोधकांना किंवा प्रसंगानुरूप स्वकीयांना सुध्दा नामोहरम करण्याचं कसब आत्मसात केलं आहे.मुळातच मुंडे घराण्याच्या तालमीत वाढलेला हा पठ्ठा कसरत,मेहनत करत हार- जीत,मानापमान सहन करून परळीच्या राजकीय आखड्यातल्या अनभिषिक्त उस्ताद बनलाय.
परळीच्या राजकीय सारीपटवरील सोंगट्या, घोडे,हत्ती, उंट यांच्या सरळ, आडव्या, उभ्या, तिरप्या, दुडक्या चालीचा योग्य आणि अचूक वापर करून घेणारा रिंगमास्टर उस्ताद वाल्मीक आण्णाचं.

ना.धनंजय मुंडे साहेबांचा प्रधान-सेनापती

राज दरबारातली प्रधान आणि सेनापती ही महत्त्वाची दोन वेगवेगळी पद. त्यांचं कामही वेगळं,राज्यकारभार करताना प्रधानाला फार महत्त्व असतं, कारण प्रधानाच्या चातुर्यानं आणि राजाच्या न्याय्य निर्णयाने  कारभार चालतो तर युद्धात सेनापतीला महत्व आहे. सेनापती च्या आदेशानुसार सैन्य लढाई करत.सेनापतीच्या आणि सैन्याच्या शौर्याने लढाया जिंकल्या जातात.राजा सैन्य आणि सेनापती च्या मागे असतो.सेनापती फुटीर,भित्रा आणि लोभी असल्यामुळे इतिहासात बऱ्याच लढाया हरल्याची अनेक उदाहरण आपण वाचली, ऐकली आहेत."वजीर"चित्रपटात विक्रम गोखले सांगतो,की 'राज्याला पराजित करायचं असेल तर त्या राजाचा वजीर आपलासा करायला पाहिजे'.त्यावरुन प्रधानाचं महत्त्व लक्षात येईल. आणि सेनापती विषयी जगप्रसिद्ध राजकीय तत्त्ववेत्ता 'सॉक्र्टीस'म्हणतो,"
A lion woh leads Donkeys can be defeated a Donkey who leads a lions."
 अर्थात, गाढवांचा सेनापती असलेला सिंह हा सिंहाचा सेनापती असलेल्या गाढवाच्या सैन्याला पराजित करू शकत.या दोन्ही विचारावरून प्रधान आणि सेनापती या दोन्ही जबाबदाऱ्या किती महत्वाच्या आहेत,हे लक्षात येईल.
   मंत्री महोदय ना.धनंजय मुंडे साहेबांच्या दरबारातल्या प्रधान आणि सेनापती दोन्ही जबाबदाऱ्या आत्तापर्यंत वाल्मीक आण्णांनी लीलया पार पाडलेल्या आहेत.निवडणूक म्हणजे युध्द. निवडणुकीत सेनापती आण्णा सैन्याला रसद, शस्त्र सामुग्री पुरवून वेगवेगळे डावपेच आखून विरोधकांना नामोहरम केलं. तसेच कारभाराच्या बाबतीत सुध्दा अण्णांचा शब्द मा.साहेब सुध्दा राखतात.बहुतांश ठिकाणी अण्णांचा शब्द अंतिम असतो. वेगवेगळ्या आघाडीवर वेगळे वेगळे सेनापती असले तरी ते सुद्धा अण्णांच्या आशीर्वादानेच.त्यामुळे वाल्मीक आण्णा प्रधान-सेनापती.

 नियोजन आणि वाल्मीक आण्णा  समीकरण

 कोणतंही काम असो,एखादी सभा असो की मोर्चा, गणेशोत्सव असो की भीमोत्सव कार्यक्रम कोणताही असो नियोजन म्हटलं की आण्णा. कार्यक्रमाच नियोजन कराव तर फक्त वाल्मीक अण्णांनीच. आण्णा आणि नियोजन हे समीकरणच बनलं आहे.कोणतंही काम असो किंवा कार्यक्रम अण्णा व्यासपीठावर कधीच नसतात, कामाचं श्रेय तर लांबची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे चित्रपटाचा दिग्दर्शक सर्व कलाकारांना सूचना देऊन त्याच्या अपेक्षेप्रमाणे काम करून घेतो पण पडद्यावर तो कधीच दिसत नाही. तसं अण्णांच काम आहे.सर्व काम करून सुध्दा कुठलाच अविर्भाव ना श्रेयासाठी धडपड.
 वाल्मीक आण्णा जे काम आणि ज्या पद्धतीने काम आणि नियोजन करतात त्याला तोड नाही.तसं काम करण्यासाठी राष्ट्रवादीतच काय पण दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे असा माणूस सध्यातरी दिसत नाही.टीकाकार टीका करतात पण अण्णांचं काम बघून तोंडात बोटं घालतात.  
   एकमेकाद्वितीय वाल्मीक आण्णा.

 अण्णांची समाजवत्सलता

राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या अडचणी काय असतात हे त्यांना अगदी तंतोतंत माहिती आहे,करण त्यांनी त्या अडचणी भोगल्या आहेत त्या परिस्थितीची जाणीव त्यांना असल्यामुळे सर्व प्रकारची मदत वाल्मीक आण्णा करतात.कुणाचा दवाखाना असो,कुणाची लग्नाची अडचण असो,माझ्या पांगरी गावात तर जवळपास प्रत्येक मुलीच्या लग्नात अण्णांचं आर्थिक सहकार्य असतं. गोरगरीबांची दवाखान्याची आणि लग्नाची लाखो रुपयांची बिलं आण्णांनी दिली आहेत.प्रत्येक अडचणीत आण्णा मदत करतात. हा अण्णांचा मोठेपणा आहे."दयावान" चित्रपटाचा नायक विनोद खन्ना प्रमाणे सर्वसामान्य माणसासाठी आण्णा 'दयावान'च्या भूमिकेत आहेत.

 अध्यात्मिकता आणि निर्व्यसनीपणा

 गणेश भक्त असलेले वाल्मीक कराड वैद्यनाथांच्या भक्तीत रत आहेत. परळीत असल्यावर सकाळ संध्याकाळ बस स्टँडच्या गणपती बाप्पा आणि प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाहीत.एकभुक्त असलेले वाल्मीक आण्णा चतुर्थी, एकादशी, गुरुवार,श्रावण महिना ही व्रत उपासना अखंड करतात.ते शुद्ध शाकाहारी,माळकरी आहेत.राजकारणांत अनेक प्रकारच्या लोकांची संगती असूनही व्यसनाधीन झाले नाहीत. ते निर्व्यसनी आहेत ही त्यांची विशेषता.पद,प्रतिष्ठा, ऐश्वर्य पायावर लोटांगण घालत असताना ह्या व्यक्तीत्वाचे पाय जमिनीवरच आहेत. निगर्वीपणा,निर्व्यसनी,कामाची तत्परता, बेजोड नियोजन, धाडसीपणा, संयम  ही त्यांची बलस्थाने.जुन्या आठवणीतले गाणे  ऐकणं हा त्यांचा एकमेव छंद. 

साम्राज्य उभं करणं अवघड नाही, त्यात वाढ करणसुद्धा अवघड नसतं मात्र ते टिकवून ठेवण मात्र फार अवघड असतं. आपण उभं केलेलं साम्राज्य असचं टिकून राहावं हीच सद्वसना आणि शुभेच्छा.
वाढदिवसाच्या निमित्ताने आपणांस उदंड आयु, आरोग्य, यश,कीर्ती, लाभो.ही वैद्यनाथ चरणीं प्रार्थना. 
                  अँड. श्रीनिवास मुंडे

परळी न.प.बांधकाम सभापती म्हणुन सौ.शोभाताई चाटेंनी पदभार स्विकारलापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
परळी नगर परिषदेच्या विषय समितीच्या नूकत्याच निवडी करण्यात आल्या होत्या.निवडी झाल्या नंतर आज न.प.मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत बांधकाम सभापती पदाचा पदभार सौ.शोभाताई चाटे यांनी स्विकारला.

सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषद अस्तिवात आहे.ना.मुंडे यांच्या संकल्पनेतुन परळीचा विकास साधत असताना मला हि याचा खारीचा वाटा म्हणुन बांधकाम सभापती म्हणुन जनतेची सेवेचे काम करण्याची संधी साहेबांनी उपलब्ध करुन दिल्याची भावना बांधकाम सभापती सौ.शोभाताई चाटे यांनी यावेळी दिली.
यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी नवनिर्वाचित सभापती सौ.शोभाताई चाटे यांचा सत्कार केला.याप्रसंगी जेष्ठनेते भास्करराव चाटे, कार्यालय अधिक्षक संतोष रोडे, आर.एच.बेंडले, व बांधकाम विभाग प्रमुख दिक्षित तसेच सर्व कर्मचारी व न प सदस्य्य उपस्थित होते.

माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का ? - अॅड.जहीरोद्दीन सय्यद हा कायदा फक्त मुस्लिम विरोधी नाही, गैरसमजुतीतुन हिंदू बांधवांनी बाहेर पडावे- शिवश्री देवराव लुगडे महाराज


परळी ( प्रतिनीधी )  

माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का? असा प्रश्न लातुरहुन आलेले ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. जहीरोद्दीन सय्यद यांनी उपस्थित केला आहे. 
 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी अॅड. जहीरोद्दीन सय्यद यांनी पंतप्रधान व गृहमंञी यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी एन आर सी, सीएए व एनपीआर हा कायदा फक्त मुस्लिम विरोधी नसून यामध्ये भारतामधील जवळपास 40 टक्के भारतीय नागरिक अटकणार आहे त्यामुळे सर्व जाती धर्मातील नागरिकांनी अशा आंदोलनला पाठींबा देवून या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केले यावेळी लातुरहुन आलेले रिटार्यड डी वाय एस पी एम एम शेख यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. दुपारच्या सत्रात मोठ्या संख्यने महीलांची उपस्थिती होती महिलांनी आक्रोश करून आम्हाला न्याय हवा, आम्ही अबला नाही सबला आहोत, हा काळा कायदा आम्हाला मान्य नाही असे ठणकावून सांगितले.

मूकनायकामुळे पिढीजात मुके बोलू लागले शाहू फुले आंबेडकर व्याख्याते भिमराव परघरमोल        डॉ बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की , ' एखाद्या चळवळीला जर स्वतःचे मुखपत्र नसेल तर ती चळवळ पंख छाटलेल्या पक्षा प्रमाणे असते '. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर ३१ जानेवारी १९२० रोजी  *मूकनायक* या नियतकालिकाची सुरुवात केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या नियतकालिकाचे नाव मूकनायक ठेवून त्या नावाच्याच खाली संत तुकाराम महाराजांचा एक अभंग उद्घृत केला होता , तो अभंग म्हणजे .
काय करू आता धरूनिया भीड l निःशंक हे तोंड वाजविले l l नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण l सार्थक लाजून नव्हे हित l l
ज्या समाजाचे नेतृत्व किंवा नायकत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं होतं, त्यासमजाचे नैसर्गिक हक्क अधिकार इथल्या मनुवादी समाज व्यवस्थेने वर्षानुवर्षांपासून नाकारून त्यांना बहिष्कृत केले होते. त्यांच्या स्पर्शाचा व सावलीचाही विटाळ मानला जात होता. म्हणून त्यांना अस्पृश्य (स्पर्श करण्या अयोग्य) म्हटल्या जात होते. अश्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला शिक्षण घेण्याचा  , संपत्ती गोळा करण्याचा  , नवीन कपडे घालण्याचा  , पायात चपला बूट घालण्याचा , तांब्या पितळेची भांडी वापरण्याचा , पंचाच्या पंक्तीत चपाती वाढण्याचा , सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्याचा , नवरदेवाला घोड्यावर बसण्याचा इत्यादी कोणताही अधिकार नव्हता. त्यांना इतर मानवा प्रमाणे तोंड तर दिले होते, परंतु या अन्याया अत्याचारा विरुद्ध बोलण्यासाठी नसून ते सर्व मुकाट सहन करण्यासाठी. त्यांच्या हे सगळं अंगवळणी पडलं होतं. आपल्या प्रारब्दाचा भाग म्हणूनही  त्यांनी हे सर्व मान्य केलं होतं. या अन्याय अत्याचारा विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकरांआधी त्यांचा कोणी कैवार घेतला नाही असे नाही . तो अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला  दाईत्वभाव संबोधता येतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो अस्पृश्यांचा कैवार घेतला त्यामागे त्यांची आईत्वाची भावना होती , कारण बहिष्कृत अस्पृश्यांचं जिनं ते स्वतः जगले होते. बालपणापासून तर उच्च शिक्षित होईपर्यंत त्यांच्यावर झालेल्या अपमानास्पद घटनांचा आघात जर बघितला तर डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आल्या वाचून राहणार नाही. म्हणूनच तर तोंड असणाऱ्या पिढीजात मुक्यांचं नायकत्व स्वतः स्वीकारुन त्यांच्या वतीने बोलण्यासाठी त्यांच्या वेदना तथा कथा आणि व्यथा चव्हाट्यावर मांडण्यासाठी मूकनायक या नियतकालिकाची  सुरुवात केली. त्यांच्या वतीने बोलताना आता कोणाचीही भिड ठेवली जाणार नाही हे व्यवस्थेच्या ठेकेदारांना ठणकावून सांगण्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग उपयोगी पडला. डॉ बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांच्या गाथेवर प्रेम करतांना म्हणायचे की, "   तुकारामाची गाथा वगळता ब्राह्मणी धर्माचे सर्व साहित्य जरी समुद्रात बुडवले तरी काही फारसं नुकसान होणार नाही " .
३१ जानेवारी १९२० ला जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी *मूकनायक* या नियतकालिकाची सुरुवात केली तेव्हा त्याचे संपादक होते पांडुरंग नंदराम भटकर व व्यवस्थापकाची जबाबदारी होती ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्यावर . तसेच या नियतकालिकाचे आश्रयदाते होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूर नरेश छत्रपती शाहू महाराज. त्यांनी या मुकनायकला २५०० रुपयांची देणगी दिली होती.(त्यावेळी सोन्याचे भाव प्रती तोळा १३ रुपये याप्रमाणे होते ) डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या मध्ये खूप स्नेह होता हे त्यांच्या मध्ये झालेल्या पत्र व्यवहारावरून दिसून येते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांच्या वाढदिवसानिमित्त एक मूकनायकाचा विशेषांक काढला होता. विशेषांक काढण्या संबंधी पाठवलेल्या पत्रामध्ये शाहू महाराजांच्या २६ जून या जन्म तारखेचा उल्लेख आढळतो. काही वर्षांपूर्वी छत्रपती शाहू महाराजांची जयंती २६ जुलै या तारखेला साजरी केली जात होती परंतु जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ते पत्र सार्वजनिक झाले तेंव्हा कागदपत्रांची छाननी करून २६ जून ही छत्रपती शाहू महाराजांची जन्म तारीख शासनस्तरावर मान्य करण्यात आली. त्यावेळी चरित्रकारही थिटे पडले.
मूकनायकातील   इतर अंकांप्रमाने पहिल्या अंकातील संपादकीय मनोगत स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं . त्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाने व्यवस्थेची कोणतीही भीड न ठेवता  पूर्णपणे चिरफाड केली होती. त्या संपादकीय मनोगतामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक विषयाला हात घातला होता. त्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम भारतातील विविधांगी , कल्पणातीत व निंदास्पद विषमतेला कटघऱ्यात उभे केले. त्यानंतर भारतीय मानसिकतेचा परामर्श घेताना ते म्हणतात की.' जर पाश्च्यात्य देशातील एखाद्या व्यक्तीला विचारले की, आपण कोण तर त्याने मी अमेरिकन, रशियन , जापानी आहे असे म्हटले तरी समाधान होते . परंतु भारतीयांना तो नियम लागू होत नाही. भारतातील एखाद्या व्यक्तीने मी हिंदू आहे असे म्हटले तर विचारणाराचे समाधान न होता तो आणखी उपप्रश्न विचारून त्याची जात जाणून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो.'त्यामध्ये पुढे ते भारतातील जाती व्यवस्थेला जीना नसणाऱ्या बहुमजली इमारत संबोधतात. त्या बहुमजली इमारतीमध्ये राहण्याचा हक्क अधिकार हा गुणावगुणावर नसून तो जन्मावर आधारलेला आहे त्यामुळे जो जेथे जन्म घेतो तेथेच त्याचा मृत्यु होतो. त्यापुढे ते भारतीय समाज व्यवस्थेचे ब्राह्मण , ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग पाडतात जे त्यांच्या आधी फक्त महात्मा जोतीराव फुले यांनी पाडले होते. शेवटी ते भारतीय समाजाच्या चुकांवरील पडदा काढतांना म्हणतात की भारतातील बरेच लोक शत्रूला मित्र व मित्राला शत्रू समजतात. याशिवाय आणखीही बऱ्याच विषयाला त्यांनी हात घातला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपादकीय मनोगतामध्ये जी भारतीय समाजव्यवस्थेची  मानसिकता विष्लेशीत केली त्यामध्ये आजच्या काळी खूप काही फरक पडला असे नाही , आज फक्त कायद्याचा बडगा आहे एवढेच.
आज भारत देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीचे तीन संवैधानिक,तर एक असंवैधानिक असे चार आधार स्तंभ आहेत संवैधनिक आधारस्तंभांनी लोकशाहीला आधार देताना कोठेतरी  कच खाल्ली तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम असंवैधानिक आधारस्तंभ म्हणजेच प्रचार प्रसार माध्येमे करत असतात. परंतु आज काही सन्माननीय अपवाद वगळता प्रचार प्रसार माध्येमे आपआपली कामे चोख बजावतात की नाही अशी शंका उपस्थित झाल्या वाचून राहत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे व त्यांची पत्रकारिता प्रसंगनिष्ठ नावाप्रमाणे काम करत होती. *मुकानायकाने* मूक्यांच्या व्यथा व वेदना प्रामाणिकपणे मांडल्या. तर बहिष्कृत भारत या वृत्तपत्राने मुक्यांना कपटाने बहिष्कृत केल्याची जाणीव निर्माण करून  मोठमोठ्या दिग्गजांना खडे बोल सूनावण्याचे काम केले.तर जाणीव झालेल्या बहिष्कृतांन समता हवी आहे, हे समता या वृत्तपत्राने भारतीय समाजमनाला मागणी केली. समता नंतर बुध्दाला अपेक्षित असणारी मानवी मूल्याधिष्ठित समाजरचना निर्माण करण्यासाठी मानवी मनाचं सिंचन करण्याचं काम प्रबुद्ध
 भारत या वृत्तपत्राने केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रीय व सामाजिक चळवळीमुळे बहिष्कृतांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्बाह्य बदल होत होता त्यांच्या मध्ये जाज्वल्य स्वाभिमानाची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. त्याचीच फलश्रुती म्हणून आज अनेक लोक आपली स्वतंत्र वृत्तपत्रीय चळवळ चालवत आहेत. काही इलेक्ट्रॉनिक तर काही सोशल मीडियाचा वापर करून मनुवादी व्यवस्थेशी रात्रंदिवस झुंज देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकपूर्ती मूकनायकास सुरेश भटांच्या कवितेच्या पुढील चार ओळी समर्पित.
 !कालचे सारे मुके आज बोलू लागले!
!अन तुझ्या सत्या सवे शब्द तोलू लागले!
!घे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना!
!भिमाराय घे तुला या लेकरांची वंदना!

              भिमराव परघरमोल
               फुले शाहू आंबेडकरी
        विचारधारा अभ्यासक                                     मो.९६०४०५६१०४

Thursday, 30 January 2020

मनपाच्या सभापतीसाठी प्रत्येक ़एक अर्ज दाखल


परभणी : मनपाच्या वतीने स्थायी समिती सभापती निवडीसाठी अर्ज नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्याक डे ३० जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला.
यावेळी प्रभाग समिती ़अ. सभापती निवडीसाठी अर्ज गोमचाळे राधीका शिवाजी, ब साठी अर्ज सय्यद समरीन बेगम फारूख, प्रभाग समिती क. साठी अर्ज नम्रता संदीप हिवाळे  दलीत वस्ती निर्मुलन घर बांधणी व समाजकल्याण समिती साठी नागेश सोनपसारे यांनी अर्ज दाखल केला. महीला व बालकल्याणसाठी सौ. माधुरी विशाल बुधवंत यांनी अर्ज दाखल केला. तर स्थापत्य समितीसाठी गवळणताई रामचंद्र रोडे , वैद्यकीय व सहाय्य आरोग्य समिती अब्दुलकलीम अ. समद, विधी समिती व महसूल वाढ समिती अ‍ॅड.अमोल पाथरीकर , शहर सुधार समितीसाठी शेख फरहत सुलताना शे. अ.मुजाहेद, माध्यमीक व पुर्वमाध्यमीक व तांत्रीक समीती विकास पभ्राकर लंगोटे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, विरोधी पक्ष नेते विजय जामकर, रविंद्र सोनकांबळे,अमोल पाथरीकर,नागेश सोनपसारे, गणेश देशमुख, फारुखबाबा,अक्षय देशमुख, अ‍ॅड. मुजाहेद खान, मो. नईम, विश्वजीत बुधवंत, बाळासाहेब बुलबुले, नागनाथ काकडे, डॉ. खिल्लारे, सचिन देशमुख, बबलू नागरे, अमोल जाधव, ईमरान झैन आदीच्या उपस्थितीत अर्ज दाखल कऱण्यात आला.
-------------------------------------------------------पोटनिवडणूक १४ अ साठी १२५ कर्मचाºयांना बी.रघूनाथ सभागृहात ३० रोजी दुपारी ४ वा. प्रशिक्षण देण्यात आले. २० बुथवर प्रशिक्षणासाठी निर्वाचण अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे,सहा. निर्वाचण अधिकारी आर.एम. जायभाये,सहा.किरण फुटाने,रईस खान, सहा आयुक्त राजाभाऊ मोरे, अदनान कादरी, मंजुर हसन आदी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी डॉ.अरविंद लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.
----------------------------------------
दि.३० रोजी सकाळी ११ वा. मनपााच्या वतीने म.गा़ंधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त दोन मिनीट मौन पाळून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त गणपत जाधव ,नगरसचिव विकास रत्नपारखे, राजाभाऊ मोरे, करुणा स्वामी, ़अविनाश पाठक,कोळशीटवार, रमेश चव्हाण, उमेश जाधव ,सुधाकर ंिकंगरे, सुलभा देशपांडे ़आदी.

" दादर येथे बाल वैज्ञानिक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न "शिशुविहार मंडळ संचालित शिशुविहार माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) दादर येथे बाल वैज्ञानिक पुरस्कार वितरण समारंभ  शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणपती यादव प्रमुख पाहुणे होते. पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष. शिशुविहार मंडळ व मुख्याध्यापिका दक्षाबेन चित्रोडा यांच्या प्रेरणेने हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होतो. मुंबईतील 31 शाळांमधील 450 निवडक विद्यार्थी स्वेच्छेने सहभागी झाले. "पाणी आणि आरोग्य" या विषयावर 51 संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले.  गार्गी लागू,  डॉ. स्मिता जाधव, जयश्री बोरिचा व हर्शला देसाई  यांनी प्रकल्पांचे मूल्यमापन केले. जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणपती यादव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना वैज्ञानिक होण्यासाठी चिकाटी व कठोर परिश्रम हे गुण आवश्यक असल्याचे डाॅ. गणपती यादव म्हणाले. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी विकास व 
संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण शिवणेकर व विश्वस्त वसुंधरा शिवणेकर यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून वर्षभर मार्गदर्शन केले. सहभागी शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे आभार मानून राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

लक्ष्मण राजे

'स्वच्छ खोपोली'तील सुभाषनगराला अस्वच्छतेचा विळखा* रस्त्यावर वाहतेय गटारीचे पाणी 
* लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
* उघड्यावर चिकन व मासे विक्रीमुळे पसरतेय दुर्गंधी
* गटारींवर अतिक्रमण, रस्ताही खाल्ला

खोपोली / प्रतिनिधी :- शहरातील सुभाषनगर परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर सोडण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यातच उघड्यावर चिकन व मासे विक्री करून घाण जवळच टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी तर पसरलीच आहे, पण मोकाट कुत्र्यांचाही हैदोस निर्माण झाला आहे. 

सुभाषनगर परिसरात गटारी व रस्ता बांधणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य गटारीचे पाणी रस्त्यावर सोडण्यात आहे. हे पाणी पटांगणात शिरल्याने चहुबाजूला चिखल व घाण पसरली आहे. गटारीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. सुभाषनगर परिसरातील लहान मुले याच पटांगणात खेळत असतात. घाणीमुळे लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.


उघड्यावरच  चिकन व मासे विक्री...
सुभाषनगर परिसरात उघड्यावरच एका कुटूंबाकडून चिकन व मासे विक्की करण्यात येत असते. गटारीच्या शेजारी असलेल्या या दुकानाची घाण जवळच पटांगणात टाकण्यात येते. त्याचप्रमाणे चिकन व माशांचे पाणी हे रस्त्यांवरच टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. मात्र, 'स्वच्छ खोपोली'चा नारा देणारे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांसह स्वच्छतेच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या या चिकनविक्रत्यांवर प्रशासन मेहरबान का? नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना स्थानिक नगरसेवकांसह नगरपालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून का बसले आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अतिक्रमणावर हातोडा कधी? 
सुभाषनगर परिसरात अनेक सुविधांचा अभाव असताना अतिक्रमणाचा प्रश्नही मोठा आहे. अनेकांनी गटारीवरच अतिक्रमण थाटले आहे. एका कुटूंबाने तर रस्ताच खाल्ला आहे. सुभाषनगरातील जुनी मशीद असलेला रस्ता काबीज करून वर पोटमाळा काढून अवैधपणे रहिवासही करण्यात येत आहे. गेली अनेक वर्ष रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या कुटूंबाकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

...आता तरी अतिक्रमण हटवा!
सुभाषनगर परिसरात गटार व रस्ता बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. बाहेरील मुख्य गटारीचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून त्यानंतर वस्तीतील गटार व रस्ता बांधण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष अतिक्रमण करून गटार व सार्वजनिक रस्ता एका कुटूंबाने काबीज केला आहे. नविन रस्ता व गटार बांधताना हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

पुन्हा अन्याय...
सध्या खोपोली शहरात सर्व भागात दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. मात्र सुभाषनगरांवर यातही अन्याय करण्यात आला आहे. परिसरात एकही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. स्वच्छतेसह विविध बाबतीत सुभाषनगरवर होणारा अन्याय दिशादर्शक फलकाबाबतही असाच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

परळीत श्री संत मन्मथ स्वामी महाराजांचा जन्मोत्सव थाटात साजरावेदांताचार्य श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन

महिलांची लक्षणिय उपस्थिती; वीरशैव लिंगायत समाजाचा उपक्रम; महाप्रसादाने सांगता

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
येथील श्री  गुरूलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) मध्ये वीरशैव लिंगायत
समाज परळीच्या वतीने श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांच्या
जन्मोत्सव आज गुरुवार  दि.30 जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी पाळना म्हणला व पुजा केली.यावेळी श्री
सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामींच्या जन्मोत्सवानंतर आरती झाली व प्रवचन झाले. यावेळी संत शिरोमणी मन्मथ
स्वामींच्या कार्यावर श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांनी प्रकाश टाकला.
श्री गुरूराज माऊली, श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय अशा जयघोषात श्री सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांचे आशिर्वचन झाले.
दरम्यान याच कार्यक्रमात सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या हस्ते नुकताच दै.मराठवाडा साथीच्या वतीने परळी भूषण व विशेष गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत समाजातील परळीचे नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, पत्रकार संतोष जुजगर व आदर्श शिक्षिका सौ.चेतना गौरशेटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी महिलांची प्रचंड संख्या होती. सकाळी पारायण दुपारी जन्मोत्सव व महाप्रसाद झाला व तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता  झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाज परळीच्या महिला, पुरूष व युवकांनी अथक परिश्रम घेतले.

शिवनामात रंगला अवघा भक्तरंग

परळी हे प्रभू वैद्यनाथ प्रभूंच्या वास्तव्याने पुणित झालेले शहर असून या शहराच्या कानाकोपऱ्यात नेहमीच अध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. त्यातही श्रीं च्या पायथ्याशी असलेल्या श्री गुरूलिंग स्वामी मठात नुकतीच संत शिरोमणी मन्मथस्वामी जन्मोत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास असलेली महिलांची मोठी उपस्थिती, भक्तीपूर्ण आणि ओजस्वी वाणीतील शिव प्रवचन यामुळे हा कार्यक्रम भक्तीरसात नान्हून निघाला. सातत्याने होणाऱ्या शिवनामात अवघा भक्तरंग भरला गेला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थित भाविकांनी संयोजकांचे आभार व्यक्त करण्यासोबतच असे कार्यक्रम मानवी जीवाला शुद्ध करण्यासोबत अंत:करणात श्रद्धेचे बीजारोपण करतात अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

बरोबरीत सुटलेल्या टि-२० आंतराष्ट्रीय सामन्यांचा इतिहास


          २९ जानेवारी २०२० रोजी न्यूझिलंड व भारत यांच्या दरम्यान खेळला गेलेला मालिकेतला तिसरा सामना मुळ कालावधीत टाय झाला.नंतर सुपर ओव्हर मध्ये रंगलेला हा सामना भारताने जिंकला. टि- २० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासातला हा टाय झालेला सतरावा सामना होता. प्रस्तुत लेखात आतापर्यंत झालेल्या सर्व टाय सामन्यांचा लेखाजोखा खास आपल्यासाठी.
          टि-२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यातला पहिला टाय सामना १६ फेब्रुवारी २००६ रोजी विंडीज व न्यूझिलंड यांच्यात झाला. या सामन्यात न्यूझीलंडने ७ बाद १२६ तर विंडीजने ८ बाद १२६ धावा केल्या.नंतर बॉल आऊटवर किवीजनी ३-० अशी बाजी मारली. हा सामना ऑकलंड येथे झाला.
         १४ सप्टेंबर २००७ मध्ये पहिल्या टि -२० विश्वचषकात डरबन येथे भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना टाय अवस्थेत थांबला. भारताने ९बाद १४१ तर पाकने ७ बाद १४१ धावा केल्या. बॉल आऊटवर भारत ३-० असे जिंकले.
           या प्रकारातला तिसरा टाय सामना ११ ऑक्टोबर २००८ रोजी झिंबाब्वे व नेदरलँड येथे झाला. झिंबाब्वेने ७ बाद १३५ तर नेदरलँडने ९ बाद १३५ धावा काढल्या. या सामन्याचा निकाल लावण्यासाठी टायब्रेकर होऊन बॉलआऊट मध्ये झिंबाब्वे ३-१ असे जिंकले.
           चौथा टाय सामना २६ डिसेंबर २००८ रोजी ऑकलड येथे न्यूझिलंड व विंडीज यांच्यात झाला. न्यूझिलंडने ७ बाद १५५ तर विंडीजने ८ बाद १५५ धावा केल्या. या वेळी बॉल आऊट ऐवजी प्रथमच सुपर ओव्हरचा अवलंब केला. सुपर ओव्हर मध्ये विंडीजने ( २५-१, १५-२ ) विजय मिळविला. 
          पाचवा टाय सामना ख्राईस्टटचर्च येथे न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झाला. यात ऑस्ट्रेलियाने ६ बाद २१४ तर न्यूझिलंडने ४ बाद २१४ धावा काढल्या. सुपर ओव्हर मध्ये न्यूझिलंडने ( ९-०, ६ -१) असा विजय मिळविला.
          सहावा टाय सामना ७ सप्टेंबर २०१२ रोजी दुबई येथे पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्या झाला. पाकने ४ बाद १५१ तर कांगारूंनी ८ बाद १५१ धावा काढल्या टायब्रेकर पाकने ( १२-० , ११-१ ) असा जिंकला.
          सातवा टाय सामना विश्वचषक स्पर्धेत २७ सप्टेंबर २०१२ रोजी श्रीलंका व न्यूझिलंड यांच्यात झाला. न्यूझिलंडने ७ बाद १७४ तर श्रीलंकेनेही ६ बाद १७४ धावा काढल्या. सुपर ओव्हरमध्ये लंकेचा ( १३-१, ७-१ ) असा विजय झाला.
          आठवा टाय सामना सन २०१२ च्या विश्वचषकातच विंडीज व न्यूझिलंड यांच्यात पाल्लेकेले येथे झाला. विंडीजने १९.३ षटकात १३९ तर न्यूझिलंडने विस षटकात ७ बाद १३९ धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये विंडीजने ( १९-०, १७ -० ) असा विजय मिळविला.
           नववा टाय सामना ३० नोव्हेंबर २०१५ रोजी इंग्लंड व पाकिस्तान यांच्यात शारजा येथे झाला. इंग्लंडने आठ बाद १५४ तर पाकने ७ बाद १५४ धावा बनविल्या. टाय ब्रेकमध्ये इंग्लंड (४-०, ३-१) असे जिंकले.
           दहावा टाय सामना १७ जून २०१८ रोजी डेव्हेन्टटर येथे आयर्लंड व नेदरलँड यांच्यात झाला. आयर्लंडने ४ बाद १८५ तर नेदरलँडने ६ बाद १८५ धावा काढल्या. सुपर ओव्हर न घेतल्याने सामना टाय असाच नोंद झाला.
           अकरावा टाय सामना कतार व कुवेत यांच्यात झाला. कतारने ६ बाद १५५ तर कुवेतने ८ बाद १५५ धावा बनविल्या. मस्कट मध्ये झालेला हा सामना सुपर ओव्हरमध्ये कतारने ( ६-०, ५-१ ) असा जिंकला.
          बारावा सामना १९ मार्च १९ रोजी केपटाऊन येथे श्रीलंका व द. आफ्रिका यांच्या दरम्यान झाला.लंंकने ७ बाद १३४ तर द. आफ्रिकेने ८ बाद १३४ धावा काढल्या. (१४-०, ५-० ) अशी आफ्रिकेने बाजी मारली.
           तेरावा टाय सामना ३१ मे २०१९ रोजी पीटर पोर्ट येथे जर्सी व जर्नसी यांच्यात झाला. जर्सी १२८ वर ९ तर जर्नसी १२८ वर ८ असा धावफलक थांबला. टायब्रेकरमध्ये जर्सी ( १५-०, १४-१ ) असे जिंकले.
          चौदावा टाय सामना रॉटरडॅम येथे नेदरलँड येथे झिंबाब्वे यांच्यात झाला. नेदरलँड १५२ / ८ तर, झिंबाब्वे सर्वबाद १५२ असा स्कोअर होता. टायब्रेकर मध्ये झिंबाब्वे ( १८-०, ९-१ ) असे विजयी झाले.
          पंधरावा टाय सामना दोहा येथे कुवेत व कतार यांच्यात झाला. कुवेतने सर्वबाद ११२ तर कतारने ८ बाद ११२ धावा काढल्या. कतारने टायब्रेकर (१४-०, १२-०) असा जिंकला.
           सोळावा टाय सामना १० नोव्हेंबर २०१९ रोजी ऑकलंड येथे न्यूूझीलंड अकरा षटकात ५ बाद १४६ व इंग्लंड अकरा षटकात ७ बाद १४६ असा झाला. शेवटी इंग्लंडने (१७-०, ८-१ ) असा टाय ब्रेक भेदला.
          सतरावा सामना २९ जानेवारी २०२० रोजी हमिल्टन येथे भारत १७९ धावा ५ बाद, व न्यूझीलंड १७९ धावा ६ बाद अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये भारताने ( २०-०, १७-o ) असा सामना खिशात घातला.

        लेखक : - दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत
.Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.