तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

उपअभियंता एस.बी.काकड यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहिर; 18 जानेवारी रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते वितरणपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता एस.बी.काकड यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहिर झाला असून 18 जानेवारी रोजी नाथ्रा येथे होणार्‍या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात प्रामाणिकपणे आपले कर्तबगार व उत्कृष्ट अभियंता म्हणून काम करणार्‍या काकड यांची सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन व स्वागत होत आहे.

अभियंता काकड हे गेली 25 वर्ष बांधकाम विभागात कार्यरत आहेत. 1994 ते 2008 या काळात सिडको औरंगाबाद, वैजापूर त्याचबरोबर सध्या परळी येथे सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणुन कार्येरत आहेत. परळी तालुक्यात त्यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती इमारत बांधकाम, पोहरनेरची जिल्हा परिषद शाळा विशेष फायबर स्टेकचर मध्ये बांधण्यात आली. याच बरोबर परळी तालुक्यात त्यांनी अनेक उत्कृष्ट रस्ते तयार केले आहेत. शासनाची वस्तीगृह, समाज मंदिरे, सभागृह, तलाठी यांचे निवासस्थान, ग्रामपंचायत इमारती तसेच अनेक कामे त्यांनी उत्कृष्ट कार्यपध्दतीने पुर्ण केली आहेत. यामुळेच त्यांना पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.  
             अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या उपविभाग परळी येथे कार्यरत आहेत. गेली 25 वर्षे अत्यंत तळमळीने सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात कार्य करणार्‍या काकड यांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत बांधकाम क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. वृक्षारोपण, रक्तदान यासाठी सदैव पुढाकार घेणारे तसेच नवीन इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक म्हणुन ही ते ओळखले जातात. सामाजिक क्षेत्रात ही ते कार्यरत असून आपल्या कामातील दर्जा श गुणवत्तेव्दारे त्यांची सर्वदूर ख्याती आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे.
           दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी नाथ्रा येथे 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन माजी कुलगुरु डॉ.जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. संम्मेनाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी साहित्यीक सोपान हाळमकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.अमर हबीब, प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, कवी प्रभाकर साळेगावकर, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर आदी उपस्थित राहणार आहेत. अभियंता क्षेत्रात नांव उंचावणार्‍या सुखदेव भाऊराव काकड (एस.बी.काकड) यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे  विविध क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a comment