तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

आर.बी.एस.के. पतकाच्या पुढाकाराने पालम येथील 20 शालेय विध्यार्थ्यांवर वाचा दोष शस्त्रक्रिया संपन्न


अरुणा शर्मा

पालम :- येथील ग्रामीण रुग्णालयात 20 शालेय विद्यार्थ्यांवर वाचा दोष शस्त्रक्रिया करण्यात आली. आर.बी.एस.के. पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मुलांची वैद्यकीय तपासणी केली असता हि मुले शब्दाचे उच्चार योग्यरित्या करत नसल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले. नंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलांमध्ये वाचा दोष असल्याचे निष्पन्न झाले. हा दोष सुधारण्यासाठी वाचा दोष शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. पालम येथील ग्रामीण रुग्णालयात मुलांवर वाचा दोष शस्त्रक्रिया करण्यात आली. तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ग्रामीण रुग्णालय व गट शिक्षण आधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. द्रोणाचार्य, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निरज, रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष वसंतराव सिरस्कर, वैद्यकीय अधिकारी डॉ. चट्टे, दंतरोग तज्ज्ञ डॉ. भस्के, डॉ. करवंदे, डॉ. कोकाटे, आर.बी.एस.के. चे पथक प्रमुख डॉ. विनायक वाखडकर, डॉ. प्रसाद काळे, श्रीमती देशपांडे, पाटील व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सूर्यवंशी, श्रीरामे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

No comments:

Post a comment