तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

बीड जिल्हा परिषदेच्या 24 जानेवारी रोजी सभापती निवड


बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा परिषदेतील अध्यक्ष  उपाध्यक्षांच्या निवडी नंतर बहुप्रतिक्षित सभापती निवडीचा कार्यक्रम अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, शिक्षण आरोग्य . कृषी पशुसंवर्धन, बांधकाम, महिला बालकल्याण या समित्यांच्या सभापतींची निवड आता २४ जानेवारीला होणार आहे. यातील १ समिती उपाध्यक्षांकडे दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेत सत्ता मिळवलेल्या महाविकास आघाडीला समिती सभापती निवडीत बहुमत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. 
बीड जिल्हा परिषदेतील अध्यक्ष उपाध्यक्षांची निवडणूक ४ जानेवारी रोजी झाली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे १३ जानेवारीपर्यंत याचा निकाल जाहीर झाला नव्हता. १३ जानेवारी रोजी तो जाहीर झाला असून अध्यक्ष उपाध्यक्षांनी पदभार घेतला आहे. त्यामुळे आता सभापती निवडीचे वेध सर्वांना लागले आहेत. 
जिल्हा प्रशासनाने यासाठी २४ जानेवारीचा मुहूर्त ठरवला आहे. २४ जानेवारी रोजी १० ते २ यावेळेत समाजकल्याण सभापती, महिला बालकल्याण सभापती  आणि  विषय समित्यांचे २ असे ४ सभापती निवडले जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील स्पर्धा पाहता यासाठी निवडणूकच घ्यावी लागेल असे चित्र आहे. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे काम पाहणार आहेत. 
अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघडीला ३२ मते मिळाली होती, ती सभापती निवडीतही टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान महा विकास आघाडीसमोर असणार आहे. सभापती पदांसाठी महाविकास आघाडीत मोठ्याप्रमाणावर रस्सीखेच असून यामुळे राजी नाराजीचे प्रसंग उद्भवत आहेत. हे पाहता सभापती निवड महाविकास आघाडीची कसरत असणार आहे. 

No comments:

Post a Comment