तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

30 वर्षात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती जागतिक पातळीवर पोहोंचली-अविनाश पाटीलपरळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :-
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती गेली 30 वर्ष महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाचे व बुवाबाजी विरुध्द काम करीत आहेत. समितीने समाजात विज्ञानवाद रुजावा, समाज विवेकी बनावा यासाठी काम केले. अनेक कायदे समितीने करण्यासाठी आंदोलनी केली. व यशस्वी झाली. जादू टोना विरुध्द कायद्या करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. याची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. व अंनिसचा गौरव करण्यात आला असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी परळी येथे बोलतांना केले.  ते परळी येथे शाखा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करीत होते.
परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे अंनिस शाखा परळीची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे प्रदान सचिव प्रा.माधव बावगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख मनोहर जायभाये, बीड जिल्हा कार्याध्य प्रा.प्रदिप चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत अविनाश पाटील, माधव बावगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याबैठकीस जी.एस.सौंदळे, प्रा.दासु वाघमारे, संपादक रानबा गायकवाड, प्रेमनाथ कदम, प्रा.विलास रोडे, तालुका कार्याध्यक्ष सुकेशनी नाईकवाडे, शाखाध्यक्ष विकास वाघमारे, अशोक मुंडे, अरुण जाधव, श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर, शौकत पठाण, सुनिल कांबळे, राहुल घोबाळे,  शरण मस्के, कपिल तरकसे, रणविर चक्रे, सिध्दांत लांडगे, सागर हनवते, पत्रकार संजिव रॉय, सुरेश रोडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment