तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

नाथरा येथे श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात साहित्य रसिकांना मिळणार मेजवानी संम्मेलनातील पुरस्कार जाहीर ; मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- श्रीनाथ मानव सेवा मंडळ, नाथरा आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संमेलन व भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.17 व 18 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय व इंदिरा बालसदनचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण मराठी साहित्य संम्मेलनात साहित्य रसिकांना मेजवानी मिळणार असून  या ग्रामीण  मराठी साहित्य रसिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  संयोजक समितीने केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील श्रीनाथ सेवा मंडळ नाथ्राच्या वतीने 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संमेलन व भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी मराठी साहित्य संम्मेलन व विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडणार आहे. दि.18 तसेच पापनाथेश्वर  माध्यमिक विद्यालय व इंदिरा बालसदनचे वार्षिक स्नेह संम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणुन माजी कुलगुरु लातूरचे डॉ.जनार्धन वाघमारे, अध्यक्ष म्हणुन डॉ.एकनाथ घ.मुंडे अध्यक्ष श्रीनाथ मानव सेवा मंडळ तर प्रमुख पाहुण म्हणुन सोपान हाळमकर मराठी साहित्यीक बीड, प्रा.कमलाकर कांबळे, प्राचार्य खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई , प्रा.अमर हबीब ज्येष्ठ साहित्यीक, अंबाजोगाई, प्रा.भास्कर बडे, मराठी साहित्यीक लातूर, प्रा.प्रभाकर साळेगावकर, मराठी साहित्यीक, माजलगांव, प्रा.मधु जामकर ज्येष्ठ मराठी साहित्यीक, परळी वैजनाथ हे उपस्थित राहणार आहेत. या संम्मेलनात दिले जाणारे पुरस्कार पुढील प्रमाणे कुस्तीभूषण पै.मुरलीधर भागवत मुंडे, कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे, शिक्षण भूषण सौ.रजनी मदन ताजने, दादासाहेब सर्जेराव कोळी, शेख सिराज, भगावत चिंटू वराट, प्रा.डॉ. महादेव रावसाहेब मुंडे, प्रा.हरिदास भागवत विधाते, कलाभूषण रानबा यादव गायकवाड, आनंद जोशी, वैजनाथ आप्पाराव तांबडे, सौ.पूनम सचिन बन्सल, स्वरभूषण आरोही अजित किंबवणे, सुभाष शेप, पत्रकार भूषण सुरेश जाधव, प्रशांत जोशी, अभियंता भूषण सुखदेव काकड, साहित्य भूषण प्रा.स्वाती प्रभाकर कानेगावकर, श्रीमती संगीत दामोदर सपकार, शिवराम रूस्तुमराव होके, संगीता गणपतराव घुगे, नागनाथ पाटलोबा बडे, डॉ. ज्योती केशवराव कदम,  डॉ. राजकुमार किशनराव यल्लावाड, अनंत भगवानराव कराड , समाजभूषण नामदेव ज्ञानदेव भोसले, लक्ष्मण आण्णा सोन्नर , युवराज रामराव खडके, मुक्तराम शिवाजी सोनवणे, चंद्रकांत हजारे तर उत्कृष्ट सन्मान ज्ञानोबा पांडुरंग आंधळे, गिरीश मोहन आपेट, श्रीमती अलका सुरनर, धिरज जंगले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संमेलनातील कार्यक्रमाचे रुपरेषा या प्रमाणे दि.17 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 2 कविता, भारुड, भजन व कथा कथन वाचन होईल. दि.18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सकाळी 08.30 ते 09.00 ग्रंथ दिंडी व शोभा यात्रा, 09 ते 09.30 मान्यवरांचे स्वागत, 09.30 ते 11.30 मराठी साहित्य संम्मेलन, 12.00 ते 02.00 पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 02.00 वाजता पसायदान करुन संम्मेलन समारोप व नंतर दुपारी 2.30 वाजता वार्षिक स्नेह संम्मेलन होणार आहे. नोट सर्वांनी वेळेचे बंधन कटाक्षाने पाहावेत. तसेच पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय व इंदिरा बाल सदन, नाथ्रा, ता.परळी वैजनाथ,जि.बीड येथे होणार आहे. या सर्व संम्मेलनातील कार्यक्रमाचा लाभ महाराष्ट्रातील साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालय, नाथरा व संयोजक समितीच्या वतीने केले आहे. 

No comments:

Post a comment