तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना पत्रकार भूषण पुरस्काराने गौरविले



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात पत्रकार क्षेत्रातील योगदानाबद्दल पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
        नाथरा येथे 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे , प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड,   कुस्ती परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे, कन्हेरवाडी येथील विकास मुंडे,  मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या संम्मेलनात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायचे काम प्रशांत जोशी यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रशांत जोशी यांना पुरस्कार गोरविल्याबद्दल त्यांचे पत्रकार क्षेत्रातील मान्यवर व विविध क्षेत्रातील मंडळींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment