तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

मुंडे साहेबांच्या 'वरळी' येथील कार्यालय उदघाटनाच्या तारखेत बदल ; उदघाटन आता २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजीमुंबई (प्रतिनिधी) :- लोकनेते गोपीनाथराव   मुंडे साहेबांचे वरळी येथील कार्यालय पुन्हा सुरू करण्यात येत असून कार्यालयाच्या उदघाटनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हे उदघाटन २६ जानेवारी ऐवजी ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी दिली.

वरळीच्या 'शुभदा' बिल्डींग मधील कार्यालय परत सुरू करण्याची तारीख २६ जानेवारी ठरवली होती पण सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, लोकप्रतिनिधी व सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने ही तारीख पुढे ढकलली आहे. आता उद्घाटन ५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता ठरवले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment