तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला वैद्यनाथ नगरीत प्रारंभ ; "पांडुरंगाच्या दरबारी" भजनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध


नित्य प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करा  - गोवत्स प.पू. श्री राधाकृष्णजी महाराज यांचे प्रतिपादन


परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- वैद्यनाथाच्या पावन भूमीत गोवत्स विठ्ठलभक्त श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.या ज्ञानयज्ञाची सुरवात आज षटतिला एकादशीच्या अमृत मुहूर्तावर झाली.नंदधाम हालगे गार्डन येथे या भव्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील जाजू परिवार व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज कथेच्या प्रथमदिनी मुख्य यजमान योगेश नंदकिशोर जाजू यांच्या हस्ते व्यासपूजन करण्यात आले.तद्नंतर त्यांनी कथेची प्रस्तावना केली.

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या सुरुवातीला महाराजांनी नामस्मरणाचे महत्व सांगितले.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या संत परंपरांना वंदन केले.श्रीमद वाल्मिकी रामायण नुसार स्वर्ण भगवान शंकराचे स्वरूप आहे,तुम्ही वैद्यनाथाच्या नगरीत राहता प्रभूंचे नित्य दर्शन करा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.भगवंताच्या कथेमुळे मानावाच्या जीवनात सुख येते.यावेळी "संत तुकाराम महाराजांच्या
"कथा सुख करी ,कथा मुक्त करी!
कथा याची बरी विठोबाची" या अभंगात भागवत कथेबाबतचे वर्णनाचे स्वरूप मांडले.पांडुरंगाच्या दरबारी भजनाने उपस्थित भाविक भक्त यावेळी मंत्रमुग्ध झालेले पाहायला भेटले.तद्नंतर प्रथमदिनी कथा झाल्यानंतर मुख्य यजमान आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भागवताची आरती करण्यात आली.या कथेसाठी परळी परिसरातील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

दि.२० जाने.ते २६ जाने.दरम्यान दुपारी १.३० ते ६.०० यावेळेत कथा श्रवण करता येणार आहे.श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाच्या प्रथम दिनी भागवत पुराण व गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांची पारंपरिक वाद्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रा मार्गावर रांगोळी,फुलांची आरास करण्यात आली. ठीक- ठिकाणी शहरातील भाविक भक्तांनी महाराजांचे पुष्पहार,पुष्कगुच्छ देऊन स्वागत केले.सकाळपासूनच या शोभायात्रेसाठी लगबग सुरू होती.शोभायात्रेत शहरातील विविध भजनी मंडळ, संघटना,शाळा, सहभागी झाले होते.अभूतपूर्व अशी ही शोभायात्रा विठ्ठल मंदीर जाजुवाडी येथून प्रारंभ होऊन पुढे-सुभाष चौक-भवानी नगर-राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेशपार - नांदूरवेस-अंबेवेस-देशमुख पार-वैद्यनाथ मंदिर मार्गे कथास्थळी पोचली.

-चौकट-
विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी वेधले गोवत्स राधाकृष्ण महाराजांचे लक्ष

दरम्यान सकाळी कथेच्या शोभयात्रेस विविध शाळातील विद्यार्थ्यांनी आपला उत्साह दाखवला यामध्ये पोद्दार इंग्लिश स्कूल,संस्कार प्राथमिक शाळा,फाउंडेशन स्कुल यांनी आपले लेझीम पथक , वारकरी , विविध वेशभूषा साकारल्या होत्या.एक अभूतपूर्व धार्मिक शोभयात्रेचा अनुभव आज परळीकरांना भेटला.महाराजांचे लक्षही या चिमुकल्यानी वेधल्याचे पहावयास मिळाले.

No comments:

Post a comment