तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे ; राज्य सरकारने बीड रेल्वेसाठी वितरित केला ६३ कोटी रुपयांचा निधीमुंबई (प्रतिनिधी) :- पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्गासाठी ६३ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे, यासंदर्भातील आदेश गृह विभागाने रविवारी काढले. दरम्यान, राज्य शासनाने या मार्गाकरिता ३१ मार्च २०१९ अखेर ९८६ कोटी ८४ लाख इतका निधी रेल्वे विभागाला उपलब्ध करून दिला आहे. 

   अहमदनगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित आहे, उक्त खर्चापैकी एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतलेला होता. त्यानुसार सदर रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत ९८६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी रेल्वेस उपलब्ध करून दिला असून रेल्वेस २०१९ - २० या आर्थिक वर्षात १२० कोटी रूपये उपलब्ध करून देण्याचे ठरले आहेत.या प्रकल्पासाठी रेल्वे विभागाने ३१ मार्च २०१९ पर्यंत एक हजार १६९ कोटी एवढा निधी खर्च केला असून सन २०१९ - २० साठी २५० कोटी रूपये इतकी तरतूद केली आहे. राज्य सरकारने हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१९-२० करिता मागणी केलेल्या रक्कमेपैकी ६३ कोटी रूपये रेल्वे विभागाला वितरित केले आहेत, तसा शासन आदेश गृह विभागाने २० जानेवारी रोजी पुरमा ०५१९/प्र.क्र.८४/परिवहन-५ अन्वये काढला आहे. 

स्वप्नपूर्तीकडे वाटचाल
----------------------------
समस्त जिल्हा वासियांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी विडा उचलला होता, बीडला रेल्वे यावी हे त्यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले व ते अजूनही सुरूच आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला तसेच राज्यानेही त्यांचा हिस्सा दिला. पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी संबंधित अधिका-यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या, या सर्वांचा परिपाक म्हणून लवकरच हा मार्ग पुर्णत्वास येण्याकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, निधी वितरित केल्याबद्दल पंकजाताई व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a comment