तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

विभक्त कुटुंबपद्धती संस्कार हीनतेचे कारण --डॉ. शालिनीताई कराडपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
मौजे मिरवट येथ कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या युवती शिबिराच्या पाचव्या दिवशी महिलांच्या आरोग्य विषयी बोलत असताना डॉक्टर शालिनीताई कराड म्हणाल्या की आज संस्कार हीनता फार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेली आहे आणि त्यासाठी विभक्त कुटुंब पद्धती हे सुद्धा एक फार मोठे कारण आहे. स्त्रियांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त करत असताना त्या म्हणाल्या की स्त्री ही कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे . आणि  तिच्याच आरोग्याकडे आजकाल दुर्लक्ष होते आहे. व्यायामा अभावी महिला कमकुवत होत चालल्या आहेत.मुळातच लोकसंख्येच्या प्रमाणात स्त्रियांचे कमी प्रमाण हा चिंतेचा विषय होत चाललाअसताना त्यात असलेल्या स्त्रियांचे कोलमडते आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनलेला आहे.  स्त्रियांचे दवाखाने भरगच्च असतात करण स्त्रिया या लवकर आजाराला बळी पडत आहेत. स्त्रियांची प्रतिकारशक्ती कमी होत चाललेली आहे. निर्मितीची शक्ती असलेली स्त्री कमकुवत होणार असेल तर मग राष्ट्राचा उद्धार कसा होणार ? राष्ट्राची उन्नती कशी होणार? कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांची मोलाची भूमिका असते. स्त्रिया या कुटुंबाचा एक फार मोठा आधार असतात म्हणून स्त्रीने स्वतः स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी त्या घेतच असतात.असे ही त्या म्हणाल्या.प्रगत राष्ट्राची पायाभरणी ही आरोग्यसंपन्न स्त्रियांच्या बळावरच होत असते . युवती शिबिराचा आज पाचवा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. त्यामध्ये सर्वप्रथम राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती यांचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमांमध्ये  अध्यक्षस्थानी  मिरच्या  उपसरपंच सौ संगीता इंगळे या होत्या.सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री भरतरावजी इंगळे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे प्रवर्तक श्री.संतोष तेलंग्रे,माजी सरपंच श्री पांडुरंग इंगळे श्री हनुमान इंगळे  श्री गणेश सुरवसे श्री भाऊसाहेब इंगळे आणि इतर ग्रामस्थ हे अवर्जून उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या वतीने   प्रा.डॉ. अार. अार. पाध्ये प्रा. आर.पी.शहाणे प्रा.अरुण चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. पी.व्ही. गुट्टे यांनी केले तर आभार सह कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.एल. जोशी यांनी मानले. 
          या शिबिराचे औचित्य साधून सकाळी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये गावातल्या आबालवृद्धांनी सहभाग नोंदविला. महिला महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख व योगशिक्षक प्रा. अरुण चव्हाण यांनी प्रात्यक्षिकासह योगविषयक मार्गदर्शन केले.
            शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या  विद्यार्थिनींनी हातात झाडू घेऊन गावाची सफाई करण्यात हातभार लावला.अशा प्रकारे या दिवसाची सांगता झाली.

No comments:

Post a comment