तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

तिळगूळ देऊन दुचाकीस्वारांना वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन


(मुंबई:अनुज केसरकर)
"तिळगूळ घ्या गोड बोला" म्हणत शालेय  विद्यार्थांनी रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या चालकांना वाहन वेगात चालवू नका, हेल्मेट वापरा कायद्याचे पालन करा, असे सांगत तिळगूळ वाटप केले काळाचौकी पोलिस स्टेशन आणि मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी हा उपक्रम मकरसंक्रांत आणि नववर्षाच्या आरंभाचे औचित्य साधून नववर्षाची भेट नागरिकांना दिली.
अभ्युदयनगरच्या श्रावण यशवंते चौकात दि १८ जानेवारी २०२० रोजी संपन्न झालेल्या या उपक्रमासाठी  काळाचौकी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय बसवत, पोलीस निरीक्षक प्रवीण कुवेस्कर, मोहल्ला कमिटीच्या स्मिता चौधरी, उमेश येवले, शमा हिरे, सुदाम परब, डॉ. प्रागजी वाजा, डॉ अनिल आव्हाड, ज्येष्ठ साहित्यिक राजन देसाई, संपादक अनुज केसरकर, साहेब एक भगवं वादळ कार्यक्रमाचे सर्वेसर्वा प्रकाश ओहळे, साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर यांच्यासह अनेक जेष्ठ नागरिक, अहिल्या विद्यालय तसेच राज क्लासेसचे विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन शेखर छत्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment