तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

कु.पै.प्रतिक्षा मुंडे यांना कुस्तीभूषण पुरस्कार जाहीर

नाथ (प्रतिनिधी) ः- येथील महिला कुस्तीपटू पैलवान कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्ती भूषण पुरस्कार जाहिर झाला असुन नाथरा येथे 17 व 18 जानेवारी रोजी होणार्‍या साहित्य संम्मेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. 
        नाथरा येथे 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन माजी कुलगुरु डॉ.जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. संम्मेनाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी साहित्यीक सोपान हाळमकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.अमर हबीब, प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, कवी प्रभाकर साळेगावकर, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर आदी उपस्थित राहणार आहेत. या संम्मेलनात परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील उत्कृष्ट कुस्तीपटू व राष्ट्रीय पैलवान, शालेय स्पर्धा, विद्यापीठ आंतरविद्यापीठ प्रतिष्ठित खाशाबा जाधव, पुणे महापौर, नागपूर महापौर चषक, सिनीयर, जूनियर स्पर्धेमध्ये तिने पदके मिळवली आहेत व कुस्ती स्पर्धेत गौरव झालेल्या पैलवान कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे यांना कुस्ती भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  मुंडे यांचे कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment