तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

परळी नगर परिषद बांधकाम सभापती सौ.शौभा भास्कर चाटे यांची बिनविरोध निवड


रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणुक आज दि.21 जानेवारी रोजी  पार पडली असुन बांधकाम सभापती म्हणून सौ.शोभा भास्करराव चाटे यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वस्तरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत असुन लोकहिताचे आणी परळीच्या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सदैव कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सभापती सौ.शोभा भास्करराव चाटे यांनी मत व्यक्त केले.
            नगर परिषद परळी वैजनाथच्या सभागृहात मंगळवारी दि. 21 जानेवारी रोजी विषय समित्यांची निवडणूक घेन्यात आली.निवडनुक अधिकारी म्हणून परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक,  मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांच्या ऊपस्थीतीत ही निवडणूक प्रक्रीया पार पडली.यावेळी बांधकाम सभापती म्हणून प्रभाग 9 (क) मधील नगरसेविका सौ.शौभा भास्कर चाटे यांची बिनविरोध निवड करन्यात आली.परळी वैजनाथ शहर हे सर्वांग सुंदर व स्वच्छ शहर बनून डिजिटल शहर बनविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कामांना प्राधान्याने सोडविण्यासाठी कठिबध्द असल्याचे नवनिर्वाचित सौ.शोभा भास्करराव चाटे  यांनी यावेळी सांगीतले. याप्रसंगी परळी नगर परिषदेचे  नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांची उपस्थीती होती.

No comments:

Post a Comment