तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 January 2020

सेनगाव तालुक्यातील घोरदरी येथील मुंगसाजी नगर येथील विद्यार्थी यांची झोपडीच्या शाळेतून सुटका

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

अखेर मुंगसाजी नगर घोरदरी तालुका सेनगाव येथील विद्यार्थ्यांची झोपडीतून सुटका, आज दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी, युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, यांनी या शाळेला भेट देऊन, येथील समस्या जाणून घेतल्या तसेच येथील शिक्षकांशी चर्चा करून, विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, तसेच सर्व प्रसार माध्यमाचे आभार मानले कारण या शाळेची बातमी दैनिक सकाळ मध्ये सुरुवातीला दखल घेतल्या गेली तसेच ,अनेक वृत्तपत्र, न्यूज चैनल, विशेष म्हणजे संजय चिलगर शिवसेना साखरा सर्कल प्रमुख, यांनी या शाळेकडे विशेष लक्ष देऊन, सर्व प्रसार माध्यमांना सहकार्य केले, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार यावेळी सर्व मुंगसाजी नगर येथील गावकरी शिक्षक विद्यार्थी यांनी मानले, आता काही दिवसांपूर्वी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख यांनी एक वर्ग खोली बांधून देण्याचे आश्वासन दिले होते, तेव्हा उपनगराध्यक्ष  सेनगाव प्रवीण महाजन यांनी येथील विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केले होते, त्यामुळे मुंगसाजी नगर येथील गावकरी, तसेच या शाळेतील शिक्षक, यांनी सर्व शिवसैनिकांचे आभार मानले. या शाळेला युवासेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी भेट देताच येथील एक वर्ग खोली स्वखर्चातून बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला तसेच त्या कामाचे उद्घाटन सुद्धा केले, पंधरा ते वीस दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल भाऊ अगस्ती,युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश पाटील गाढवे, शहरप्रमुख संतोष पाटील, वैभव देशमुख, प्रताप लोखंडे, शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन राऊत, शिवसेना सर्कल प्रमुख संजय चिलगर, शेतकरी सेना सर्कल प्रमुख निळकंठ भादलकर, संतोष हराळ आदींची उपस्थिती होती.


तेज न्युज हेड लाइन्स ऑनलाईन वेब  वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर णिरगुदे

No comments:

Post a comment