तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

कुठल्याही अटी शर्तीशिवाय सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सरकारने शब्द पाळावा-अजित नवले






परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने  शेतकरी कर्जमुक्ती, रब्बी हंगामातील पीक विमा भरून घ्यावा व मागील हंगामातील राहिलेला पीक विमा मिळावा. या व इतर शेतकरी प्रश्नावर सिरसाळा या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किसान सभेचे  महाराष्ट्र राज्य सचिव काँ.अजित नवले यांनी बीड जिल्ह्यातील खरीप 2018 चा पीक वीमा शेतकऱ्यांना मिळवून दिल्या बद्दल किसान सभा बीड जिल्हा उपाध्यक्ष अजय बुरांडे यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या सातबारा वरील सर्व कर्ज माफ करावे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतमालाला दीडपट हमी भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्यासाठी सर्वंकष पीक वीमा धोरण राबवावे.यासाठी पक्षभेद विसरून सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होण्याचे आहवान या प्रसंगी त्यांनी केले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकजुटीतून 75℅ शेतकऱ्यांचा पीकविमा प्रश्न सुटका असला तरी शेवटच्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे त्याच्या खात्यात जमा होईपर्यंत संघर्ष सूरुच राहणार असल्याचे अजय बुरांडे यांनी सांगितले. दुष्काळी अनुदान, प्रधानमंत्री किसान सन्मान मदत,पीकविमा व इतर प्रलंबित शेतकऱ्यांच्या पश्नावर दि.10फेब्रुवारी2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देण्याचे ठरवण्यात आले. या प्रसंगी काँ. विठ्ठल मोरे, काँ. पी.एस.घाडगे,यांनी शेतकऱ्यांना संघटित होण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काँ. दत्ता डाके हे होते तर मंचावर मुरलीधर नागरगोजे, सुदाम शिंदे, गंगाधर पोटभरे,काशिराम सिरसाट इत्यादि उपस्थित होते. या कार्यक्रमास विविध गावातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती  दाखवली. अनेक गावातील शेतकऱ्यांनी पीकवीमा अंदोलन यशस्वी केल्या बद्दल अजय बुरांडे यांचा सत्कार करुन अखिल भारतीय किसान सभेचे आभार मानले.

No comments:

Post a comment