तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पुरस्काराने अलंकृत


        
सात्रळ /प्रतिनिधी 
बाबासाहेब वाघचौरे  : - वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना   " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड - २०१९ " देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला.
            श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना त्यांच्या सामाजिक सेवेतील उत्तम कार्याबद्दल डब्ल्यूसीपीएचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या हस्ते " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड - २०१९ " देऊन सन्मानित आले. या प्रसंगी श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, जेष्ठ गांधीवादी विचारवंत ई.पी. मेनन, अर्थतज्ञ प्रा. नरसिंहा मूर्ती, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजेश कोकरे,डब्ल्यूसीपीए श्रीरामपूर  ( महाराष्ट्र) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे, सचिव भाऊराव माळी, बाबासाहेब चेडे, भिमराज बागुल, अमोल राखपसरे व बाबासाहेब वाघचौरे हे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a comment