तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परळी वै ते तुळजापूर पायी दिंडी चे आयोजन शिवसैनिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- राजेश विभुते

 प्रतिनिधी) :- शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जनसेवेसाठी बळ दे आई हे साकडे घेऊन परळी वैजनाथ ते तुळजापूर पायी दिंडी चे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे या दिंडीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी केले आहे. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी च्या आशीर्वादाने व जनतेच्या प्रेमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले त्यांना जनसेवेसाठी व शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी बळ मिळावे हे साकडे घेऊन शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश भैय्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पायी दिंडीस सुरुवात होणार आहे पुढे अंबेजोगाई -मुरुड-तेर-धाराशिव मार्गे आराधी व गोंधळ्यांच्या समूहासह गावागावात भवानी मातेचा जागर करत ही दिंडी दिनांक २३ जानेवारी रोजी तुळजापूर येथे ठीक दुपारी १२ वाजता पोहचणार आहे तेथे आई जगदंबेची महापूजा करून तुळजा भवानीस साकडे घालण्यात येणार असून या भक्तिमय वातावरणातील दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment