तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

सर्वोदय हाॅस्पिटल जवळील एस.टी स्टॅन्ड पुर्ववत होण्याकरिता मा. नगरसेवक दिपक बाबा हांडे यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांना दिले निवेदन

बाळू राऊत
 प्रतिनिधी 
घाटकोपर (पश्चिम) येथील सर्वोदय हाॅस्पिटल जवळील एस.टी स्टॅन्ड पुर्ववत होण्याकरिता वार्ड क्रमांक-१२८ मा.नगरसेवक दिपक बाबा हांडे वार्ड क्रमांक-१२८ शाखा प्रमुख संतोष साळुंखे, दिलीप बामणे यांनी परिवहनमंत्री अँड अनिल परब यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदन देण्यात आले त्यावेळेस परिवहन मंत्री महोदय सन्मा.नामदार अॅड.अनिलजी परब साहेब यांनी उत्स्फूर्त मान्यता दिली
घाटकोपर (पश्चिम) येथे लालबहादूर शास्त्री मार्गा वरील सर्वोदय हाॅस्पिटल जवळ सदर एस.टी स्टॅन्ड गेल्या ६०वर्षा  पासून अस्तित्वात होता परंतु बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी रस्ता रुंदीकरण ह्या कारणास्तव ८ महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले त्यामुळे एस.टी प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे...
 घाटकोपर (पश्चिम) व आजूबाजूच्या परिसरातील आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांतील रहिवासी अनेक वर्षांपासून नोकरी व्यवसाया करिता वास्तव्या करिता आहेत, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,कोकण, मराठवाडा,विदर्भ, खानदेश ई. ठिकाणी खेडेगावात तसेच शहरा मध्ये जाण्यासाठी एसटीने प्रवास करित असतात,सदर एसटी स्टँड नसल्याने मागील महिन्यां पासून अत्यंत गैरसोय होत आहे, सदर प्रवाशी सततची मागणी करित आहे याबाबत संबंधित एसटी महामंडळ यांना लेखी कळविले आहे तसेच याबाबत आंदोलन करण्यात आले होते परंतू याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही..

No comments:

Post a comment