तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते पल्स पोलीओ लसीकरणाचा शुभारंभ


बुलडाणा, दि. 19 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री  जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते आज बालकांना पोलीओचा डोज पाजून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सकाळीच जिल्हा सामान्य रूग्णालयात पालकमंत्री यांनी लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. त्यानंतर उपस्थित बालकाला पोलीओचा डोज त्यांच्याहस्ते पाजण्यात आला. सर्व पात्र बालकांना 100 टक्के पोलीओ लसीकरण करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. असलम, डॉ हर्षद, सुनील जोशी, श्री. सोळंके, श्री. साबळे आदींची उपस्थिती होती.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment