तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

ग्रामस्वच्छता व जलसंवर्धनासाठी मुधापुरीत युवती विशेष शिबिर


सुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. 15 ॒ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे  ग्राम स्वच्छता व जलसंवर्धनासाठी युवती विशेष शिबिर मौजे मुधापुरी ता. गेवराई जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 17 ते 23 जानेवारी या कालावधीत हे  विशेष शिबिर होणार आहे.
         17 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी विधान परिषद सदस्य मा. अमरसिंह पंडित यांच्या हस्ते या युवती विशेष शिबिराचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश शिंदे सरपंच मुधापुरी, श्रीराम आरगडे संचालक जय भवानी सहकारी साखर कारखाना, पत्रकार संतोष भोसले, सखाराम शिंदे, तर डॉ. कांचन परळीकर प्राचार्य महिला महाविद्यालय गेवराई ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर समारोप कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, अध्यक्षस्थानी डॉ. कांचन परळीकर प्राचार्य महिला महाविद्यालय, जगन्नाथ शिंदे व्हाईस चेअरमन जयभवानी सहकारी साखर कारखाना गढी यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून टि. आर पाटील संचालक या.से.यो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर, पत्रकार गणेश सावंत, विनोद पवळ यांची उपस्थिती लाभणार आहे. प्राध्यापक बापू घोक्षे,  राजश्री हिवरेकर घोलप,  शिनगारे एन. एस. , शिलेदार पी.पी. , बी. ए. वादे , दिवाण एस. जी, रासकर बी.आर. , एम .पी .गव्हाणे , जी. जी. कदम आदींचे शिबिर कालावधीत मार्गदर्शन लाभणार आहे शिबिर कालावधीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज ,आरोग्य तपासणी ,मराठवाड्यातील जलव्यवस्थापन रक्तदान शिबिर व बचत गटातून महिला सबलीकरण पशुचिकित्सा शिबिर व ग्रामीण विकासात लोकसहभागाचे महत्त्व आधुनिक शेतीचे व्यवस्थापन 23 जानेवारी रोजी समारोप होईल. जलसंवर्धन, जलव्यवस्थापन, वृक्षारोपण व संवर्धन व्यसनमुक्ती कार्यक्रम प्रबोधन आणि ग्रामीण पुनर्रचना महिला सबलीकरण निर्मलग्राम अंधश्रद्धा निर्मूलन माती बंधारा समाजजागृती रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
       शिबिराची दिनचर्या मध्ये प्रार्थना योगासने अल्पोपहार श्रमदान बौद्धिक क्षेत्र मैदानी खेळ सांस्कृतिक कार्यक्रम ,भोजन, कार्यक्रम राबवण्यात येणार आहे . या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. कांचन परळीकर डॉ. कल्पना घारगे, डॉ. कैलास सावंत, डॉ. संगीता आहेर, डॉ. संतोषकुमार यशवंतकर, व कु.कोमल आरबड विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a comment