तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

प्रा. डॉ मुक्ता सोमवंशी यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता


सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांना लोकप्रशासन विषयाच्या संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिली असून तशा आशयाच्या पत्रान्वये विद्यापीठाच्या कुलसचिवांनी कळवले आहे. 
शहरातील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ येथे प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांनी मागील २१ वर्षापासून लोकप्रशासन विषयाच्या अध्यापक म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी डॉ.अजय पाटील (प्राचार्य, श्रीमती सुशीला देवी महाविद्यालय लातूर) यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून पी. एच् डी. ही पदवी प्राप्त केली पंचायतराज संस्थेतील महिला प्रतिनिधी व निर्णय प्रक्रिया कार्यालय प्रशासन ही पुस्तके प्रकाशित आहेत तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमधून त्यांनी शोधनिबंध वाचन केले आहे. महिला हिंसाचार या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन केले आहे त्यांनी 30 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांची लेखन केले आहे. त्यांचा हा सर्व अनुभव विचारात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना नुकतेच लोकप्रशासन विषयासाठी संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माननीय परमेश्वररावजी कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment