तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

स्पिनकलरच्या तोट्या चोरल्या व पाईप जाळले!डोणगाव परिसरात चोरट्याची दहशत शेतकऱ्याचे ९० हजाराचे केले नुकसान.

एक दिवस आधीच मांदणी रस्त्यावर शेतकऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली होती.

  डोणगांव:-१६
 परिसरात शेता मधील चोऱ्यांचे प्रमाण मागील काही महिन्या पासून वाढलेले आहे मात्र अद्याप परियांत चोरट्यांचा छडा लागलेला नाही तर दुसरीकडे चोरट्यानी चोरी सोबतच न चोरता येणारे शेती साहित्य जाळपोळ व शेतकऱ्यास मारहाण अश्या घटना  घडत आहेत त्याने शेतकरी दहशतीच्या छायेत आहे.
   डोणगाव परिसरात सध्या शेतात पिकाला पाणी देण्याचा हंगाम सुरू असल्याने बोर मधील मोटार,विहिरीतील पंप,स्पिनकलर तोट्या,पंपाचे केबल अश्या चोरीच्या घटना घडत आहेत नियमित हिणाऱ्या चोऱ्या आणि चोरटे पसार हे नेहमीच घडत आहे  अश्यातच मांदणी,नेतंसा,अचल या शेत शिवारात तोट्या चोरीच्या घटना घडतच आहेत तर याच परिसरात दोन दिवस आधी एका शेतकऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली या घटनेची दहशत कायम असतांनाच माजी प्राचार्य जीवनसिह दिनोरे यांच्या शेतातील राइटी शेत शिवारात ६० स्पीकणकलर चे पाईप चोरट्यानी जमा करून त्याला आग लावली व ३० तोट्या चोरून नेल्याची घटना १२ जानेवारीच्या रात्री घडली विशेष म्हणजे चोरट्यानी शेतात विखरलेले पाईप जमा करून नंतर त्याला आग लावली अश्यात त्यांचे अंदाजे ९० हजारच्या जवळपास नुकसान झाले या संबंधी जीवसनसिह दिनोरे यांनी डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली.
   शेता मध्ये होणाऱ्या चोऱ्या,जाळपोळ व शेतकऱ्यास मारहाण पाहता शेतकरी दहशतीच्या छायेत आहेत पोलीस प्रशासनाने त्वरित यावार उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment