तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

पाथरीत मराठा मावळा संघटनेच्या वतीने निषेध



प्रतिनिधी
पाथरी:- छत्रपती शिवरायांची तुलना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने संपुर्ण राज्या सह देश आणि जग भरातून संतप्त प्रतिक्रीया येत असतांना पाथरीत मावळा संघघटनेने या विषयी तहसीलदारांना निवेदन देत निषेध केला आहे.
 या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याची जगाच्या पातळीवर कोणीही तुलना करू शकत नाही परंतु भाजपा नेते भगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून याला भाजपाचा पाठिंबा दिसतो. अशा प्रकारचे पुस्तक लिहून गोयल यांनी नीच्य पातळी गाठली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची कुणी बरोबर करू शकत नाही. त्यामुळे या पुस्तकाचा व घटनेचा मावळा युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच पुस्तक लिहिणा-या  जय भगवान गोयल यांच्या वर कार्यवाही करून पुस्तकावर बंदी आणावी. अशी मागणी निवेदनाद्वारे पाथरी तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावेळी मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भाले, पाटील यांनी केली आहे. यावेळी राकॉ वक्ता तालुका अध्यक्ष सुनील जाधव, युवक जिल्हाध्यक्ष अतुल टेकाळे, पुरोगामी विचार मंच चे तालुका प्रभारी सतीश गवारे, तालुका उपप्रभारी महादेव गवारे , तालुका सल्लागार अनिल गालफाडे, अॅड  बी .जे गायकवाड शिवभक्त राजेश नवले, गणेश थावरकर, शेतकरी चक्रधर टेकाळे, माऊली काळे, तुशन  भाले पाटील,राहुल वानखेडे राजेंद्र, माने व सर्व शिवभक्त यावेळी निवेदन देताना उपस्थित होते .लवकरात लवकर जय भगवान गोयल यांच्यावर गुन्हा दाखल करून ह्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी जर बंदी नाही आली तर मावळा युवा संघाच्या वतीने राज्यभरात तीव्र प्रकारच्या आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती मावळा युवा महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अमोल भाले पाटील यांनी यावेळी या निवेदनात दिली आहे.

No comments:

Post a comment