तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

अखेर जमीन महसुलात सुटसह शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयाचे परिक्षा शुल्क माफ!
सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांच्या मागणीला यश

मंगरुळपीर-सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांसह शेतमजुरांचेही मोठे  नुकसान होते तसेच अशा हलाखीच्या परिस्थितीत त्यांच्या पाल्यांना शिक्षणात प्रशासनाने प्राधान्याने भरीव मदत तसेच शैक्षणीक शुल्क माफीसह आरक्षणही द्यावे असे मत सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रसिध्दीपञकाव्दारे मांडुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.प्रशासनाने दखल घेत वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी सर्व गावातील जमीन महसुलात सुट देवुन शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्क माफ केल्याचे आदेश दि.१६ जानेवारी रोजी निर्गमीत केले आहेत.
               निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह शेतमजुरांना भरीव मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. सततचा दुष्काळ व नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी व शेत मजूरांचे अतोनात नुकसान होत आहे.राज्य व केंद्र शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खर्च करावा लागतो आहे.शेतकऱ्यांना शाश्वत मदत करण्यासाठी शासनाने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांना शिक्षणात आरक्षण द्यावे अशी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी मागणी केली होती.सततचा दुष्काळ व भीषण पाणी टंचाईला तोंड दिल्या नंतर वाशिम जिल्हा अवेळी झालेल्या अतिवृष्टीच्या संकटाचा सामना करत आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपालांनी मदत केली आहे.परंतु वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सद्यस्थितीत ठोस आर्थिक मदतीची गरज असल्यामुळे राज्यपालांनी केलेली मदत निश्चितच दिलासा देणारी नाही.केंद्र सरकारने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भगत यांनी केली होती.या मागणीवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढुन महसुलात सुट आणी शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पाल्याचे शाळा व महाविद्यालयीन परिक्षा शुल्क माफ केल्याचे दि.१६ जानेवारी रोजी जाहीर केले.या आदेशाने वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.भविष्यात तोंड द्याव्या लागणाऱ्या संकटांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत “अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यामुळे भविष्यात चारा टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण होऊ शकतो.चारा टंचाईच्या प्रश्नासह शेतीपीके व गुरांवर रोगराईचा परिणाम होऊ नये म्हणून शासनाने वेळेत खबरदारी घेऊन चारा टंचाई व रोगराई निवारणासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली असल्याने याकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

शेतमजुरांना मदत देण्याची आग्रही मागणी

नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार मार्फत मदत केली जाते.परंतु शेती रोजगारावर उपजीविका असलेल्या शेतमजुरांना अशा प्रकारची मदत केली जात नाही.नैसर्गिक आपत्तींमुळे शेती व शेतीशी निगडित उद्योग धंद्यांवर परिणाम होत असल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर व सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना शेत मजुरांसह शेतीवर अवलंबून असलेल्या इतर घटकांना मदत करून दिलासा द्यावा या आग्रही मागणीसह शेतीवर आधारित उद्योग धंदे उभारले जावेत व हवामान खात्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करून नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचना वेळेत शेतकऱ्यांना द्याव्यात अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment