तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

शिर्डी करांनो सबुरीने घ्या-आ दुर्रानीकिरण घुंबरे पाटील

पाथरी:- शिर्डी ही जरी श्रीसाईबाबांची कर्मभूमी असली तरी जन्मभूमी ही पाथरीच आहे. हे खेर यांच्या तीस वर्षाच्या अथक संशोधनातून सिद्ध झाले आहे. तसे पुरावे उपलब्ध आहेत. पाथरी या साईबाबांच्या जन्मस्थळाचा विकास होत असेल तर शिर्डीचे महत्व कमी होत नाही. भक्त दोन्ही ठिकानांना तेवढेच मानतात म्हणून शिर्डीचे महत्व कमी होत नाही. जरा सबुरीने घेण्याचा सल्ला विधानपरिषदेचे आ बाबाजानी दुर्रांनी यांनी गरूवार १६ जानेवारी रोजी श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिरात आयोजित साई स्मारक समिती आणि सर्व पक्षिय कृती समिती बैठकीत आयोजित सत्कार समारंभा वेळी बोलताना शिर्डी करांना दिला.
या वेळी विश्वस्थ संजय भुसारी,कुलकर्णी अॅड चौधरी, सुरेश ढगे,मुंजाजी भाले पाटील, भावनाताई नखाते, दादासाहेब टेंगसे, अनिल नखाते,माधवराव जोगदंड, शिवराज नाईक, मुंजाभाऊ कोल्हे,सुभाषराव कोल्हे, सदाशिव थोरात, आशोकराव गिराम, नितेश भोरे, अलोक चौधरी, राजिव पामे, सुनिल उन्हाळे,आदी विविध पक्षांचे पदाधिकारी यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी पुढे बोलतांना आ दुर्रानी म्हणाले की, या ठिकाणी दर दिवशी देशाच्या विविध भागातून जवळपास पाच हजारावर भाविकभक्त येत असतात. या भक्तांची गैर सोय होत आहे. भक्तांची सोय होण्या साठीच आताचे राष्ट्रपती महामहिम कोविंद साहेबांनी विकास कृती आराखडा देण्या साठी पाथरी भेटी वेळी सांगितले होते. त्या अनुशंगाने राष्ट्रपती मोहदयांनी राजभवनात मुख्यमंत्री,राज्यपाल आणि ट्रस्टीची बैठक घेत या कृती आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. चार टप्यात पैसे देण्याचे मान्य केले होते. परंतु औंढ्याला निधी दिला पण पाथरीला नाही दिला. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विकासाचा आढावा घेताना हा निधी देण्याची आमची परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी मान्य केली. त्या मुळे आता ख-या अर्थाने विकासाला चालना मिळणार आहे. याच वेळी सर्व पक्षीय सर्व समावेशक कृती समितीच्या अध्यक्ष पदी आ बाबाजानी दुर्रानी यांच्या नावाची घोषणा विश्वस्त संजय भुसारी यांनी केली. या वेळी आ दुर्रानी यांनी शहरा कडे येना-या सर्व महामार्गावर कमानी उभारणार असल्याची घोषणा ही या वेळी केली.

शिर्डी वाल्यां कडे पुरावे नाहीत-भुसारी

पाथरी हे श्रीसाईबाबांचे जन्मस्थान नाही याचा एकही पुरावा शिर्डीकरांकडे नाही. आणि पाथरी हे जन्मस्थान असल्याचे आपल्या कडे २९ पुरावे असल्याचे विश्वस्त संजय भुसारी म्हणाले. त्या मुळे शिर्डी करांनी विरोधा साठी विरोध करणे थांबवावे असेही ते म्हणाले. बिर्ला ग्रुप या ठिकाणी चारशे कोटी रुपये खर्चून चारएटी हॉस्पिटल ऊभारणार आहे. त्या साठी कृती समितीच्या माध्यमातून आता पाठ पुरावा होणे गरजेचे असल्याचेते म्हणाले. ज्या मद्रासच्या रमनींनी शिर्डीला अठराशे खोल्यांचे भक्त निवास बांधून दिले त्यांनीच येथील मंदिरात मुर्ती दिली आणि अन्न दाना साठी निधी ही तेच देतात असे या वेळी सांगितले. या वेळी झालेल्या कार्यक्रमाला हजारो भाविक भक्त सर्व पक्षीय नेते,कार्यकर्ते व्यापारी,पत्रकार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले.

No comments:

Post a Comment