तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

आर.एम.ओ- पी.ए.-सी.ए.- मेडिकल असोसिएशन बैठक संपन्न .....!


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- 
आज आपल्या संघटनेची दुसरी बैठक ठरल्याप्रमाणे कॕनाॕट गार्डन येथे पार पडली. आजच्या बैठकीला मागच्या बैठकिपेक्षा दुप्पट प्रतिसाद लाभला.शहरातील विविध हाॕस्पिटलचे आरएमओ या बैठकिला हजर होते.

*
आजच्या बैठकित मागच्या बैठकित ठरलेल्या मुद्यांचा आढावा घेण्यात आला.त्या अनुषंगाने पुढिल वाटचालीसाठी आवश्यक बाबींचा विचार करण्यात येवून तो कृतीत कसा उतरवता येईल यावर सकस चर्चा झाली.

एमजीएमचे आरएमओ डाॕ. विशाल नरवणे  यांनी आपण कसे हाॕस्पिटलवर डिपेंडट आहोत याचा परिचय देत करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली.तसेच हाॕस्पिटलमध्ये कमी वेतनावर आपण काम करताना सुरक्षा गरजेचे असल्याचे सांगितले.

धूत हाॕस्पिटलचे आरएमओ डाॕ. पंकज शर्मा यांनी संघटनेच्या नोंदणीसाठी आवश्यक व जलद सर्व शहरातील आरएमओ यांची नोंदणी गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच नोंदणी शुल्क रुपये १००/-  ठेवत लगेच नोंदणीला सुरवात करण्यात आली.

कृष्णा हाॕस्पिटलचे आरएमओ डाॕ. गिरिश सारडा यांनी तत्काळ नोंदणी करत या आठवड्यात आपण जास्तीत जास्त आरएमओ यांची संघटनेत नोंदणी करणार असल्याचा विडा उचलला.

देवगिरी हाॕस्पिटलचे डाॕ.सिद्धेश्वर तळेकर यांनीप्रत्येक हाॕस्पिटलमध्ये  फिरुन आपल्या आरएमओ सदस्य नोंदणी करणार असल्याचे सांगितले.

डाॕ.सुनिल राजपुत यांनी संघटना नोंदणी प्रक्रिया व कायदेशीर बाबींवर चर्चा घडवून आणली.तसेच लवकरच संघटनेचे सदस्य  प्रतिनिधींची निवड करत संबंधित हाॕस्पिटलचे आरएमओ यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.


कॕनाॕट मध्ये बैठक आटपून  रुषी प्रसाद कॕन्टिनमध्ये चहा घेण्यात आला.तसेच पुढिल बैठकित या पेक्षा दुप्पट आरएमओ येतील असा आशा व्यक्त करण्यात आली.

या बैठकित डाॕ.सुनिल राजपुत,डाॕ. पंकज शर्मा,डाॕ. विशाल नरवणें,डाॕ. गिरिश सारडा, डाॕ.सिद्धेश्वर तळेकर,डाॕ.दिपक मेहेत्रे व इतर हाॕस्पिटलचे आरएमओ  सदस्य हजर होते. तरी सदस्य नोंदणीसाठी संपर्क डाॕ.विजय जगताप 9730434326, डाॕ.तळेकर         7058023460, डाॕ.सारडा           7620034449 डाॕ. पिसे         9403657128, डाॕ.नरवणे         9405292852 डाॕ.सुनिलसिंग राजपुत ९८२३५३८७२६ साधावा

No comments:

Post a Comment