तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

योगेश सोमन सक्तीच्या रजेवरछात्र एकता ज़िंदाबाद
बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सच्या संचालकपदी असलेल्या योगेश सोमन यांना विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. संघीय मानसिकतेच्या सोमन यांनी विद्यापीठात विद्यार्थी विरोधी वातावरण निर्माण केले होते.अनियमीत लेक्चर, विना अनुभव प्राध्यापक अशा अनेक कारणाने विद्यार्थी त्रस्त होते. कलिना कैम्पसमधे विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. आ.कपिल पाटील यांच्या पुढाकाराने कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याशी रात्री १२ वाजता चर्चा करून रजिस्टार श्री.अनिल देशमुख आणि परीक्षा नियंत्रक श्री. विनोद पाटिल यांनी सोमन यांना सक्तीच्या रजेवर पाठवीत असल्याचे जाहीर केले. विद्यापीठ याबाबद चौकशी समिती नेमणार असून पुढील कारवाईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील नवीन फकॅलटी आणि विद्यार्थ्यांच्या इतर सर्व अडचणी तात्काळ आठवड्या भरात पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आले. या आंदोलनाला छात्र भारतीचा पाठिंबा होता आणि संपूर्ण आंदोलनात छात्र भारती सहभागी होती. छात्रभारती ज़िंदाबाद छात्र शक्ती जिंदाबाद                                         *- सचिन बनसोडे, राज्यसंघटक, छात्र भारती*

No comments:

Post a comment