तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

ग्रामिण साहित्य संम्मेलनात कुस्तीपटू प्रतिक्षा मुंडे हिला कुस्तीभूषण पुरस्कार प्रदानपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील महिला कुस्तीपटू पैलवान कु.प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे यांना श्रीनाथ मानव सेवा संस्था आयोजित 5 वे  ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन निमित्ताने त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल कुस्ती भूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संम्मेलनात कु.प्रतिक्षाचे वडील सुर्यकांत मुंडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
        नाथरा येथे 5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होते. दुसर्‍या दिवशी दि.18 जानेवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कु.प्रतिक्षा मुंडे हिने कुस्ती स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचा श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने कुस्तीभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे , प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड,   कुस्ती परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे, कन्हेरवाडी येथील विकास मुंडे,  मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  मुंडे यांचे कुस्तीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

     कुस्तीपटू प्रतिक्षा सुर्यकांत मुंडे यांचे वडील सूर्यकांत मुंडे यांनी पुरस्कार घेतल्या याप्रसंगी बोलतांना , बीड जिल्हासह परळी पंचक्रोशीतील नाथ्रा येथील हा पुरस्कार कुस्तीपटू ला बळ व प्रोत्साहन देणार आहे आणि  जोग महाराज व्यायाम शाळेचे आंतरराष्ट्रीय कोच व महाराष्ट्रचे कोच प्रमुख प्राध्यापक पै. दिनेश गुंड सर व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कुमारी अंकिता गुंड व त्यांची टीम यांनी प्रतीक्षा कडून प्रचंड मेहनत करून घेतली व त्याचेच फळ आज आपणास दिसत आहे. प्रतिक्षा  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ताथ परळी विधानसभा मतदार संघाचे ना.धनंजय मुंडे यांची दत्त कन्या आहे. वेळो वेळी प्रा.दिनेश गुंडा सर व कुस्ती ज्येष्ठांचे मार्गदर्शन व  पाठबळ नेहमीच प्रतिक्षाच्या पाठीशी खंबीरपणे असते,  यापुढेही प्रतीक्षा तिने गावाचे जिल्ह्याचे व व्यायाम शाळेचे नाव राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर  उंचवावे अशी अपेक्षा कुस्तीक्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे.  प्रतिक्षा मुंडे हिला कुस्तीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव केकान, नवनिर्वाचित आ.संजय दौंड,  विक्रिकर आयुक्त विश्वासराव मुंडे, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी सौ.दिपाताई मुधोळ-मुंडे, ओमप्रकाश शेटे,  न्यायधिष आनंद मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे, माणिकभाऊ फड, जिल्हा परिषद सदस्य बबनदादा फड, नगरसेवक प्रा.पवन मुंडे, बबनभाऊ गित्ते, बालाजी उर्फ पिंटू मुंडे, सुरेश (नाना) फड, प्रविण फड, सूर्यभान मुंडे, जयप्रकाश लड्डा, अनंत केंद्रे, राम सोनी, अरूण आर्धापुरे, आरूण साबु, कुस्ती मार्गदर्शक सुभाष नानेकर, तपोवनचे शिवशंकर कराड, देवराव कदम, प्रा.जगदिश कावरे, प्रा.अतुल दुबे, कृष्णा मुंडे, समाधान मुंडे, बंडू मुंडे, पै.रामेश्वर मुंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी मुंडे, अनंत गित्ते, पै.मोहन मुंडे, मुंजा कराड आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment