तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

लाभार्थ्यांना घरकुलांचा निधी न दिल्यास करणार महामुक्काम स्वाभीमानी जि अ प्रशांत डिक्करसंग्रामपुर (प्रतिनिधी) निधी अभावी बंद पडलेल्या शेकडो लाभार्थ्यांचे घरकुल बांधकामं पुर्णकरण्या करीता अनुदानाचे चेक द्या. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्यकार्यपालन अधिका-यांना निवेदनातुन दिला आहे. तालुक्यातील पंचायत समीती अंतर्गत प्रधान मंत्री योजनेतील शेकडो लाभार्थ्ंयांना शासनाने घरकुल बांधकामास मंजुरात दिली.पंरतु निधी नसल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम बंद पडले आहे. ही घरकुल योजना निधी अभावी थंड बस्त्यात पडल्याने अनेक लोकांची राहण्याची व्यवस्था नसल्याने थंडिच्या दिवसात उघड्यावर दिवस काढत आहेत.एका बाजुला घरकुल हप्त्यासाठी लाभार्थ्यांची पंचायत समीती मधे दररोज पायपीट होत असुन हा सर्व त्रास सहन करीत आहेत.अजुन किती दिवस उघड्यावर काढायचे हा प्रश्न लोकानंसमोर उभा राहला आहे. त्या करीता तत्काळ लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाचे चेक द्या.अन्यथा कोणत्याही क्षणी पंचायत समीतीमधे महामुक्काम आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रतिलीपी जिल्हाधिकारी,तहसीलदार ठाणेदार यांना देण्यात आल्या आहेत.या वेळी स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रोशन देशमुख,स्वाभिमानीचे नेते मोहन पाटील,ता.अध्यक्ष उज्वल चोपडे,प्रविण येणकर,विलास तराळे,सुनिल अस्वार,शिवा पवार,महम्मद शहा,जगन्नाथ हागे,नवल मोरखडे,प्रशांत बावस्कार उपस्थित होते,

No comments:

Post a Comment