तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

वैद्यनाथ कॉलेज रा . से यो व आर . टी. ओ . कार्यलया व्दारे रस्ता सुरक्षा अभियान जनजागरण वाहतूक नियमाने पालन सुरक्षीत जीवनासाठी आवश्यकच - आर . टी. ओ . शरदचंद्र वाडेकर  जनजागरण वाहतूक नियमाने पालन सुरक्षीत जीवनासाठी आवश्यकच  - आर . टी. ओ . शरदचंद्र वाडेकर

परळी- वैजनाथ (प्रतिनिधी) : - येथील वैद्यनाथ कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आर . टी. ओ . , बीड - अंबेजोगाई व पोलीस  विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सडक सुरक्षा - जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन रस्ता सुरक्षा अभियाना द्वारे जनजागरण प्रबोधना नुकताच दि . १५ जानेवारी २०२० संपन्न झाला . यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आर . टी. ओ शरदचंद्र वाडेकर, एम. के . कांबळे  यांनी विशेष मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर, रा . से . यो. प्रा . डॉ . माधव रोडे, शरद धनचक्कर, उपप्राचार्य डॉ . व्ही . जे . चव्हाण, प्रा . डॉ . बी . व्ही . केंद्रे, मुरलीधर पाळवदे,प्रा . एस . एम . सुर्यवंशी , अदि उपस्थिती होते . 
या प्रसंगी सडक सुरक्षा - जीवन रक्षा रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करताना आर . टी. ओ . शरदचंद्र वाडेकर म्हणाले 
रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागरण करून आम्ही जीवन रक्षा साठी प्रयत्न करत आहोत, आपण सर्व वाहनधारक युवकांना वाहतूक नियमाने पालन सुरक्षीत जीवनासाठी खुप महत्वाचे व आवश्यकच आहे
प्रत्येक मानसाचे अमुल्य आहे . एका मनुष्याचे  जीवन हे सामाजिक आणि कौटुंबिकदृष्टया असाधारण असे असते, त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून आपल्या समाजासाठी व कुटुंबासाठी जबाबदारीचे भान निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे .  रस्ता सुरक्षा अभियाना द्वारे जनजागरण करत रोड सेफ्टी - टाईम फॉर अॅक्शन, वाहतूक सुरक्षेसाठी  ''स्‍टे अलिव्‍ह - डोण्‍ट ड्रींक एण्‍ड ड्राईव्‍ह" हे ब्रीदवाक्‍य देण्‍यात आले आहे. दारुसारख्‍या मादक पदार्थांचे सेवन करुन आपले आणि इतरांचेही  जीवन धोक्‍यात आणण्‍याच्‍या प्रवृत्‍तीला यानिमित्‍ताने आळा बसण्‍यास मदत होईल, अशी आशा आहे.
थांबा , पहा आणि मगच रस्ता ओलांडा या मंत्राचे कृपया पालन करा, पादचारी रस्तांचा राजा असून पादचाऱ्यांनी फुटपाथचा वापर करावा, लहान मुले, वृद्ध , अपंग, अंध व्यक्तीना रस्ता ओलांडण्यात मदत करा . ड्रायव्हिंग लायसन्स असल्याशिवाय वाहन चालवू नका आणि ड्रायव्हिंग लायसन्स व  वाहनाची इतर कागदपत्रे, नोंदणी पुस्तका, विमा , कर पुस्तिका नेहमी सोबत बाळगा .आपल्या वाहनाचे. हेडलाईट, ब्रेक लाईट , टेल लॅम्प, साईड इंडिकेटर आणि आरसा सुस्थितीत असल्याची खात्री करू घ्या . हेल्मेटशिवाय वाहन चालवू नका ,वाहन नियमाचे पालन करा . दोन मोठ्या वाहनातून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका . मोटर सायकल थांबविताना पुढील व मागील ब्रेकचा एकाच वेळी वापर करा वाहन चालकाने  वाहन चालवताना मोबाईल फोनचा फोन करणे, स्विकारणे, मेसेच वाचणे, पाठवणे, गेम खेळणे वापर करणे कायद्याने गुन्हा आहे . मोटर वाहन कायद्यामध्ये नुकत्याच केलेल्या सुधारणेनुसार वाहन चालविताना चालकाने मोबाईल फोनचा वापर केल्यास केवळ दंड भरून सुटका होणार नसून चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स देखील निलंबीत केले जाते , प्रवास करता आपण वाहन नियमाचे पालन करावे . वाहनाची देखभाल - दुरूस्ती वेळोवेळी करून ध्वनी प्रदुषण हार्नचा वापर योग्य करावा व प्रदुषण टाळावे . यावर शरदचंद्र वाडकर विवंचन करून पीपीटी, छोट्या छोट्या चित्रपटा द्वारे मोलाचे मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा . डॉ . माधव रोडे यांनी केले तर विशेष आभार प्रा डॉ . रमेश राठोड यांनी व्यक्त केले . यावेळी मोठया संख्येने उपस्थिती विद्यार्थांना रस्ता सुरक्षा अभियान २०२० ची पत्रके, पुस्तके वाटप करण्यात आली .

No comments:

Post a Comment